श्री ईश्वर कातकडे साहेब यांची भंडारा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती
पाचोरा प्रतिनिधी ( अनिल आबा येवले )
नुकत्याच महाराष्ट्र शासनाने पोलीस अधिकारी यांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये काही अधिकारी यांना प्रमोशन दिले असेच श्री पाचोरा येथे दोन वर्षांपूर्वी नागपूर येथून डी वाय एस पी म्हणून बदली करून आले होते त्यांनी पाचोरा तालुक्यात डी वाय एस पी ची सूत्रातील घेतल्यानंतर अनेक चांगल्या कामगिरी केल्या गुन्हेगारांवर वचक कायदा सुव्यवस्था राखण्याकरता केलेले नियोजन शहरात शांतता ठेवण्याकरता सर्वांची हितसंबंध जपून सर्वांना समान न्याय देऊन कार्य करीत असे एक साधे सरळ व्यक्तिमत्त्व पोलीस खात्यातील सक्षम व डॅशिंग अधिकारी कायद्याच्या चौकटीत काम करून सर्वांना सहकार्य करीत असे पाचोरा शहरात तीन वर्षाच्या काळात खरोखर उत्तम कामगिरी वेळोवेळी व्यापारी पोलीस पाटील शांतता कमिटी सदस्य सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मंडळ यांना नेहमी सहकार्य करून मार्गदर्शन करीत असे नेहमी हसतमुख चेहरा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना नेहमी सहकार्याची भावना श्री ईश्वर कातकडे साहेबांची बदली पाचोरा येथून धुळे येथे गृह विभाग डी वाय एस पी म्हणून झाली होती त्यांनी धुळे येथे एक वर्षाच्या काळात अनेक मोठ्या गुन्हेगारांवर कारवाई करून त्यांना जेरबंद केले त्यांची ती यशस्वी कामगिरी पाहून महाराष्ट्र शासनाने त्यांना पदोन्नती देऊन भंडारा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती केली त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे