पाचोरा तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन मोठया उत्साहात साजरा

पाचोरा येथे राष्ट्रीय ग्राहक हक्क दिना निमित्ताने पाचोरा तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

ग्राहकांना हक्कांची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्कांबाबत सक्षम व्हावा, यासाठी विविध संघटना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करतात. यासाठीच 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन (National Consumer Rights Day) म्हणून साजरा केला जातो. त्याच प्रमाणे पाचोरा तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राहक कसा जागृत असायला हवा त्याच मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कर्यक्रमात मोठया प्रमाणात विविध संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला यात ग्राहक संघटनेचे अध्यक्ष बि डी पाटील, पूनम थोरात, अभिजित येवले, शेखर बोर्डे, आर आर मराठे, आर व्ही शिरसाठ, निर्मला देशमुख, पत्रकार दिलीप परदेशी, कुंदन बेलदार, शिव पाटील, साहेबराव पाटील, शुभम सपकाळे, योगेश कोष्टी, सुरेश सोनवणे, फिरोज देशमुख गोविंदा पाटील हे उपस्थित होते.