गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत यश….!!!!
भडगाव (प्रतिनिधी) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील खेळाडूंनी जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय शालेय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत १९ वर्षाआतील विविध क्रीडा प्रकारातील विजयी/उपविजयी खेळाडूंची नाशिक येथे पार पडणाऱ्या नाशिक विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेतील यशस्वी खेळाडू…!!!!
१) भाग्यश्री भगवान पाटील (१५०० मी.धावणे,प्रथम)
२) वर्षा भाईदास पाटील (क्रॉसकंट्री प्रथम)
३) ऐश्वर्या योगेश पाटील (क्रॉसकंट्री द्वितीय तसेच उंचउडीत तृतीय)
४) गायत्री श्रावण सोनवणे (४०० मी.हर्डल्स द्वितीय)
५) नम्रता नथ्थू हिरे (क्रॉसकंट्री षष्टम)
६) सुप्रिया भिमराव पाटील (४×४०० मी.रिले द्वितीय)
७) भाग्यश्री ज्ञानेश्वर पवार (४×४०० मी.रिले द्वितीय)
८) हर्षदा पांडुरंग पाटील (४×४०० मी.रिले द्वितीय)
९) विशाखा दिपक महाजन (४×४०० मी.रिले द्वितीय)
१०) पायल दौलत पाटील (४×४०० मी.रिले द्वितीय)
११) निखिल विजय देसले (४×१०० मी.रिले तृतीय)
१२) गौरव सुनिल भदाणे (४×१०० मी.रिले तृतीय)
१३) निकेश बुधा कोळी (४×१०० मी.रिले तृतीय)
१४) गोपाल रामभाऊ गावंडे (४×१०० मी.रिले तृतीय)
१५) प्रणव आनंदराव गोसावी (४×१०० मी.रिले तृतीय)
यशस्वी खेळाडूंना आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,राष्ट्रीय पंच प्रा.प्रेमचंद चौधरी,यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,प्र.प्राचार्य संदीप बाविस्कर,प्र.कार्यवाहक रघुनाथ पाटील यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.