गो.पु.पाटील,विद्यालयातील विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

गो.पु.पाटील,विद्यालयातील विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड…!!!!_

भडगाव (प्रतिनिधी) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय व भडगाव तालुका क्रीडा समितीतर्फे आयोजीत भडगाव तालुकास्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत
देवयानी दिलीप पाटील (भालाफेक प्रथम),रीना नितीन पाटील (५ कि.मी. चालणे द्वितीय),शुभांगी भागवत पाटील (भालाफेक द्वितीय),भाग्यश्री विजय पाटील (लांबउडी प्रथम),नंदिनी प्रकाश पाटील (३००० मी.द्वितीय),सुवर्णा सुनील खैरनार (गोळाफेक द्वितीय)
या विद्यार्थिनींची १७ वर्षाआतील जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.
खेळाडूंना बी.डी.साळुंखे,चेतन भोसले,एस.ए.वाघ,प्रा.प्रेमचंद चौधरी आदिंचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत पाटील,अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.