जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा ने पटकावला प्रथम क्रमांक
जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा जळगाव येथे पार पाडल्या. गुरुवारी १४ वर्षा खालील मुला आणि मुलांच्या स्पर्धेत १४ तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.हे सर्व विद्यार्थी तालुका स्तरावरून यशस्वी होऊन जिल्हा पातळी वर सहभागी झाले होते.
स्पर्धा स्वीसलीग पद्धतीने 7 फेऱ्या घेण्यात आल्या.यात १४ वर्षाखालील मुलींमध्ये पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी अदिती अलाहित हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
नाशिक विभागीय पातळीवरील सदर विद्यार्थिनीने प्रवेश मिळविला असून या सन्मानार्थ स्पोर्ट्स हाऊस, जळगाव तर्फे सुवर्णपदक देण्यात आले. पारितोषिक वितरण महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनेचे उपाध्यक्ष श्री फारुक शेख यांच्या हस्ते करण्यात आले .या वेळीं स्पर्धेचे समन्वयक प्रशिक्षक श्री मीनल थोरात, मुख्य पंच,प्रवीण मकरे, दत्तू सोमवंशी, चंद्रशेखर देशमुख,रवींद्र धर्माधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तसेच गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य श्री प्रेम शामनानी,मुख्याध्यापिका सौ. कल्पना वाणी,क्रीडा शिक्षक श्री दिलीप चौधरी, पर्यवेक्षक सौ अमिना बोहरा तसेच शाळेचे शिक्षक वृंद यांनी अदिती अलाहीत ला पदक देऊन सन्मानित केले.