महाआवास अभियान ग्रामीण 2020-21 अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना शासकीय जागा उपलब्ध करून दिल्याबाबत जळगांव जिल्हास प्रथम पुरस्कार
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत घरकुल आवास योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाने महाआवास अभियान “ सर्वांसाठी घरे 2022” या अंतर्गत जळगाव जिल्हा भुमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन ग्राम पंचायत स्तरावरील गाव ठाण,सरकारी गावठाण,पंडित दिनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थ सहाय्य योजना,अतिक्रमण नियमाकुल दि.06 जुन 2021 ते 5 जुन 2022 या अभियान कालावधित 2103 जागा भुमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
• जळगाव जिल्ह्यात भुमिहीन लाभार्थी 18843 पैकी 13842 इतक्या लाभार्थ्यांनासर्वाधिक विनामुल्य शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.त्याकरीता जळगाव जिल्ह्याला महाआवास अभियान प विशेष पुरस्कार भुमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे बाबत प्रथम पारीतोषिका करीता मा.जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा यांची निवड करण्यात आलेली आहे.
• या अभियाना अंतर्गत राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट तालुका द्वितीय क्रमांक मुक्ताईनगर तालुका यांची पुरस्कारा करीता निवड करण्यात आलेली आहे.
सदरचे पुरस्कार अमृत महाआवास अभियान 2022-23 याच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ दि.24 नोव्हेबंर 2022 दुपारी 3.00 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर,नरीमन पोईंट,मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमाचा शुभारंभ मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला तसेच मा. उपमुख्यमंत्री श्री.देवेद्र फ़डणवीस,मा.ग्रामविकास मंत्री श्री.गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट तालुका द्वितीय पुरस्कार मुक्ताईनगर तालुक्यातील तात्कालीन गट विकास अधिकारी श्री.संतोष नागटिळक यांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमास अतिरीक्त मुख्य सचिव,ग्राम विकास व पंचायत राज विभाग श्री. राजेश कुमार व संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण,महाराष्ट्र् राज्य यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.