लब्बैक फाउंडेशन तर्फे शहीद टिपू सुलतान जयंती साजरा
संपूर्ण जगात प्रथमच क्षेपणास्त्र प्रक्षेपण करणारे व इंग्रजांची लढताना आपल्या देशासाठी प्राण देणारे स्वातंत्र्यसैनिक शहीद टिपू सुलतान यांची जयंती पाचोरा शहरातील लबबैक फाउंडेशन तर्फे साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ईकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव चे चेअरमन डॉक्टर अब्दुल करीम सालार हे होते. अडव्हकेट जुबेर शेख धुलिया, मुख्य अतिथी मुफ्ती हारून नदवी साहेब , लेखक व शायर साबीर मुस्तफा आबादी व अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी दाखवले की अमेरिकेत नासा मध्ये ज्या भारतीय मिसाईल मेन ची चित्र लावलेले आहे तो शेरे मयसूर टिपू सुलतान आहे. ही गोष्ट प्रत्येक भारतीय साठी गौरवची आहे. टिपू सुलतान यांनी शिक्षण, व्यापार, विज्ञान, अनुसंधान, व्यवस्थापन, प्रशिक्षित नौदल, आंतरराष्ट्रीय संबंध, यावर आपले उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. या कार्यक्रमाला यशस्वी बनवणारे लब्बैक फाउंडेशन चे सदस्य शाकीर शाह, जुबेर खाटीक, खलील सय्यद, गफार सय्यद, यांचे सामाजिक कार्या बद्दल मान्यवराकडून कौतुक करण्यात आले.यावेळी दहावी व बारावीचे विद्यार्थ्यांचे व कष्टाळू शिक्षक शेख जावेद व रेहान खान यांचे सत्कार करण्यात आले. गफफार सय्यद, व जुबेर खाटिक यांच्या कडून आभार व्यक्त करण्यात आले. मंचवर मजहर पठाण,निहाल बागवान, हाजी अल्ताफ, जाकीर कुरेशी, रसूल उस्मान, मुस्लिम बागवान, जाकिर अलाउद्दीन,रफिक मेमबर,लतीफ मेमबर, खलील दादा देशमुख, नसीर बागवान, डॉक्टर इम्रान पिंजारी,संजय चौधरी, तहसील शेख, आदिल शेख हे उपस्थित होते. सूत्र संचालन साबीर मुस्तफा आबादि यांनी केले.