स्पर्धा परीक्षा सारथी “या पुस्तकाच्या लेखनाबद्दल आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते प्रा.राजेंद्र चिंचोले यांचा सत्कार

स्पर्धा परीक्षा सारथी “या पुस्तकाच्या लेखनाबद्दल आमदार किशोर  पाटील यांच्या हस्ते प्रा.राजेंद्र चिंचोले यांचा सत्कार

 

महात्मा ज्योतिबा फुले व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती महा निमित्त पाचोरा येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा.राजेंद्र चिंचोले यांचे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील योगदानाबद्दल व त्यांनी महाराष्ट्रातील मुलांना स्पर्धा परीक्षांची सखोल माहिती देणारा माहितीकोश “स्पर्धा परीक्षा सारथी “या पुस्तकाच्या लेखनाबद्दल आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .तसेच शिवव्याख्याते श्री रवींद्र पाटील यांचे “वेध रायगडाचा “या पुस्तक प्रकाशनाबद्दल व ग्रामीण भागातील तळागाळात वाचनालय ची चळवळ चालवणाऱ्या वाचनालय संचालक व अध्यक्ष यांचा सत्कार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .

याप्रसंगी शिव व्याख्याते रवींद्र चव्हाण लिखित वेध रायगडाचा या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पाचोर्‍याचे प्रांताधिकारी विक्रमजी बांदल , पाचोर्‍याचे तहसीलदार कैलास चावडे, ज्येष्ठ नेते नानासाहेब प्रतापराव पाटील ,पाचो-याचे माजी नगराध्यक्ष संजय गोहिल ,माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, शितल सोमवंशी,प्रकल्प प्रमुख गजू भाऊ पाटील, साहित्यिक पि के सुतार, नरेंद्र पाटील ,आर आर पाटील ,सुधीर शेलार प्रमुख म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाकूर सर व सूत्रसंचालन बी एन पाटील यांनी केले.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पुस्तक व वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचन संस्कृती तरुणांमध्ये कशाप्रकारे वृद्धिंगत करता येईल यासाठी सर्व वाचनालय चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते आणि साहित्य क्षेत्रातील तज्ञांनी प्रयत्न करावेत .विद्यार्थ्यांना पुस्तक व डिजिटल माध्यम यांच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य केल्यास विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती ही वृद्धिंगत होईल .याप्रसंगी प्रा.राजेंद्र चिंचोले यांच्या कार्याचा गौरव आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केला.
प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी युवकांनी विविध पुस्तकांच्या व साहित्याच्या माध्यमातून ज्ञानर्जन करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवIव्यात व स्पर्धा परीक्षांमध्ये आपले करिअर करावे अशा प्रकारचे आवाहन केले.
तहसीलदार कैलास चावडे यांनी महाराष्ट्राला साहित्य व विचारवंतांचा इतिहास आहे या विचारवंतांच्या विचारांनी व साहित्याने प्रेरित होऊन युवकांनी यशाचे शिखर गाठावे अशाप्रकारे अशा प्रकारचे आवाहन केले.
सत्काराला उत्तर देताना राजेंद्र चिंचोले यांनी विविध स्पर्धा परीक्षा व करिअरच्या वाटा यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध वाचनालयांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच विद्यार्थी व वाचनाचा छंद जोपासणारे रसिक उपस्थित होते . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृष्णा पाटील सर यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भैया शिंदे ,शशीभाऊ महाजन, उमेश महाजन ,पितांबर भोसले ,मनोज पाटील ,वाघ सर ,नामदेव पाटील, कुंभार सर ,जगताप सर ,एन एस पाटील सर यांचे सहकार्य लाभले