आंतरमहाविभागीय स्पर्धेसाठी कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगावच्या महिला खेळाडूंची निवड…!!!!!
कोळगाव (भडगाव) -कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगाव येथील कु.मयुरी सुभाष माळी व कु.जयमाला निंबा महाजन या दोन महिला खेळाडूंची आंतरविभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.दोघींना क्रीडा विभाग समन्वयक प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
क.ब.चौ.उ.म.वि.जळगाव,अंतर्गत एरंडोल विभाग क्रीडा समिती द्वारा कला,शास्र व वाणिज्य महाविद्यालय,चोपडा,येथे एरंडोल विभागीय आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धा १० व ११ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडल्या,सदर स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या कोळगाव महाविद्यालयाकडून खेळताना कु.जयमाला निंबा महाजन (उंचउडीत प्रथम) तथा कु.मयुरी सुभाष माळी (५००० मी.धावणे द्वितीय तथा भालाफेक व लांबउडीत तृतीय) चमकदार कामगिरी करीत यश संपादन केले,दोघी आंतरविभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत,दोघींच्या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा जिल्हा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संदीप बाविस्कर,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,मुख्याध्यापक कमलेश शिंदे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.