आत्मनिर्भर कृषी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, पाचोरा येथे आत्मा व स्मार्ट प्रकल्पांतर्गत तपासणी व क्षेत्रीय भेट संपन्न
पाचोरा
येथील आत्मनिर्भर कृषी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड येथे आत्मा व स्मार्ट प्रकल्पांतर्गत तपासणी व क्षेत्रीय भेट संपन्न झाली. शासन कृषी क्षेत्रातील कंपन्यांसाठी विविध योजना राबवत असते. भारत हा कृषीप्रधान देश आहे मात्र, बियाण्यांच्या उपलब्धतेपासून तयार मालाला मिळणार्या भावापर्यंत तर पुढील प्रक्रिया उद्योग पर्यंत शेतकरी बांधवाच्या अनेक समस्या दीर्घकाळ प्रलंबित असल्याने शेतकर्यांची उन्नती व प्रगती होण्याच्या दिशेने प्रत्यक्षात काहीच प्रयत्न दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यावर उपाय म्हणून प्रत्यक्ष शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन आपल्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे याच उद्देशाने आर्वे खेडेगावातील तरुण विशाल विजय नेवे यांनी अनेक शेतकऱ्यांना एकत्र आणत या कंपनी ची स्थापना केली.
शेतकऱ्यांच्या प्रगती व विकास कामांसाठी या कंपनीने अनेक प्रकल्पांसाठी अर्ज केलेला आहे. या पैकी आत्मा व स्मार्ट प्रकल्प अधिकाऱ्यांनी काल दि 4 नोव्हेंबर रोजी कंपनीला प्रकल्प स्थळ गोराडखेडा बु येथे भेट दिली. तसेच सर्व अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची भरभरून कौतुक केले व भावी वाटचालीसाठी कंपनी चे अध्यक्ष विशाल नेवे यांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. यामध्ये सुनील जी वानखेडे (विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी, स्मार्ट प्रकल्प विभाग नाशिक), जितेंद्र शहा (उपसंचालक नाशिक, स्मार्ट प्रकल्प), दादाराव जाधव (जिल्हा नोडल अधिकारी), कुर्बान तडवी (कृषी उपसंचालक, आत्मा), श्रीकांत झांबरे (तालुका नोडल अधिकारी जळगाव), एन व्ही नायनवाड (उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा), ए व्ही जाधव (तालुका अधिकारी पाचोरा तथा नोडल अधिकारी, स्मार्ट प्रकल्प), सचिन भैरव (बी टी एम, आत्मा) हे उपस्थित होते. तसेच कंपनीतर्फे कंपनीचे अध्यक्ष विशाल नेवे व संचालक उज्ज्वला पाटिल मनिषा पाटिल दिपक पाटील ज्ञानेश्वर पाटिल गौरव पाटिल मयुर पाटिल सोनाली महालपुरे गुड्डी पाटिल व सभासद शेतकरी उपस्थीत होते.