टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ या उपक्रमांतर्गत श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा. शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविलले सुरेख, आकर्षक आकाश कंदील
कला शिक्षक प्रमोद पाटील यांच्या अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी कलाकृती सादर
पाचोरा ( प्रतिनिधी) आज सर्वत्र बाजारात प्लास्टिक पासून पर्यावरण घातक असे आकाश कंदील सर्वत्र दिसत आहेत परंतु पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से .हायस्कूल पाचोरा. येथील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू उदाहरणार्थ घरातील पुठ्ठा, कार्डशीट, वर्तमानपत्र, मनी हाताने डिझाईन करून विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे आकर्षक आकाश कंदील बनवून जणू प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प घेतला या विद्यार्थ्यांच्या कलाकृती मुख्याध्यापिका पी.एम. वाघ .मॅडम उपमुख्याध्यापक एन .आर. पाटील. यांनी कौतुकाची थाप दिली. त्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून येथील कलाशिक्षक प्रमोद .एम. पाटील. सर यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. यावेळी विद्यार्थ्यांना शाळेतर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व भविष्यात असाच उपक्रम सुरू ठेवावा म्हणून कलाशिक्षक यांचे कौतुक केले.