महावितरण कंपनीच्या बदली विषयक कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्याकरीता महाराष्ट्रभर दि.१७ ऑक्टोबरला २०२२ ला आंदोलन
महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे वतीने जळगाव परिमंडळ कार्यालय समोर आज धरणे आंदोलन निदर्शने व निषेध द्वार सभा
संघटनेचे परिमंडळ सचिव जळगाव कॉ.विरेंद्रसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने कामगार संघटना बरोबर चर्चा करून बदली धोरण निश्चित परिपत्रक ५१४ काढून अंमलबजावणी सुरू केली होती.मात्र कंपनीने तयार केलेल्या बदली धोरणाला सदया हरताळ फासला आहे.गेल्या तीन वर्षापासून विविध कारणे पुढे करून इच्छुक कामगारांच्या बदल्या करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे.अत्यंत गंभीर आजाराने ग्रस्त, पती-पत्नी एकत्रीकरण,सेवानिवृत्तीस काही वर्ष शिल्लक असताना हवी असलेली बदली,बदली धोरण अंतर्गत लांब ठिकाणी गेलेले कर्मचारी यानी परत मूळच्या ठिकाणी मागितलेली बदली,नवीन लागलेले कामगार घरापासून हजारो किलोमीटर दूर आहेत त्यांना आपल्या भागामध्ये हवी असलेली बदली,पदोन्नतीवर पदस्थापना देण्यापूर्वी मुख्यकार्यालय झोन,मंडळ,विभाग कार्यालय पातळीवर प्रथम विनंती बदल्या करून नंतर पदस्थापना देण्यात येत होती.पदोन्नतीवर झाल्यानंतर जागा रिक्त असताना इच्छुक ठिकाणी न देता लांब ठिकाणी करण्यात येणारी पदस्थापना,एका झोन मधून दुसऱ्या झोन मध्ये विनंती बदलीवर गेल्यानंतर परत त्या कर्मचाऱ्यांना लांबच्या ठिकाणी पदस्थापना देण्याची पद्धत, कधी कंपल्सरी व्हैकन्सीचा कन्सेप्ट तयार करून बदल्या न करणे इत्यादी कारणाकरीता कर्मचाऱ्यांच्या त्रास देऊन मानसिक छळ प्रशासनाने सुरू केलेला आहे.
मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर केले की कोणत्याही विनंती बदल्यावर शासनाची स्थगिती नाही.राज्य शासनामध्ये सर्व आयएए (IAS) अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या होतात. निर्मिती व पारेषण कंपन्यांमध्ये तसेच शिक्षण व इतर विभागा मध्ये बदल्या होतात.महावितरण कंपनीचे प्रशासन कामगार संघटनांना सांगते की,महाराष्ट्र शासनाने बदल्यावरती बंदी घातलेली शासनाने फक्त ३० जून पर्यंत बंदी घातली होती.त्यानंतर कोणताही आदेश काढलेला नाही.कधी महावितरण कंपनी सांगते की, विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीकडे बदल्याची परवानगी मागण्याचा प्रस्ताव पाठविलेला आहे. सूत्रधारी कंपनीची जून महिन्यापासून एकही बैठक झाली नाही काय ? किंवा कर्मचाऱ्यांच्या जिवाळाच्या प्रश्नावर चर्चा करण्याकरीता सुत्रधारी कंपनीचे संचालक मंडळास वेळ नाही काय ? हा प्रश्न कर्मचारी कामगार संघटनांना विचारत आहे. सध्या कंपनीचे प्रशासन कामगार संघटना व कामगारांची दिशाभूल करत आहे.महावितरण कंपनीचे प्रशासन मनमानी कारभार करत असून कामगार संघटनांना चेंज ऑफ नोटीस न देता अनेक धोरणात्मक एकतर्फी बदल करत आहे.कंपनीची आर्थिक परिस्थिती खराब आहे.या नावाखाली फक्त वसुली हे एकच काम शिल्लक राहिलेला आहे व वसुली केली नाही तर खाजगीकरण होईल असे सांगून कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करत आहे.अपुरे कर्मचारी,बंद असलेली कामगार भरती,मेन्टेनन्स करीता लागणाऱ्या साहित्याचा अभाव,अपुरे विद्युत मीटरचा पुरवठा,वसुलीच्या नावाखाली कर्मचाऱ्यावर होत असलेली मारहाण,अपघात झाल्यानंतर कर्मचाऱ्यावर दाखल करण्यात येणारे गुन्हे,छोट्या छोट्या कारणासाठी कर्मचाऱ्यांना विविध प्रकारची शिक्षा देणे,१/३, एखाद्या प्रकरणात तो दोषी नसेल तरी त्याला निर्दोष न सोडता कमीत कमी शिक्षा म्हणून रु.५० हजाराची शिक्षा करणे, एक किंवा दोन इन्क्रिमेंट बंद करणे,हा आता प्रघात पडलेला आहे.कारण नसताना निलंबन करणे,कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आवाज दाबणे.इत्यादी कारवाई करण्यात येत आहे.या सर्व धोरणाला कामगार कंटाळलेले आहे.
संघटनेच्या केंद्रीय महिला कार्यकारिणी सदस्या श्रीमती संध्या पाटील मैडम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की व्यवस्थापनाला कामगार संघटना बरोबर चर्चा करण्यास वेळ नाही.चर्चेत चर्चा झाली व मान्य केलेल्या प्रश्नावर कारवाई करायला वेळ नाही,महावितरण कंपनी प्रशासनाच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात *महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन* *संघटनेच्या वतीने संघर्षाची भूमिका कोल्हापूर बैठकीमध्ये घेऊन प्रलंबित प्रश्न करीता आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.*
*सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉ.देविदास सपकाळे,कॉ.प्रकाश कोळी,कॉ.विलास तायडे,कॉ.जितेंद्र अस्वार, कॉ.मुकेश बारी, कॉ.मनोज देवराळे,कॉ.दीपक मराठे,कॉ.वैभव वानखेडे,कॉ.किशोर जगताप,कॉ.प्रभाकर महाजन,कॉ.शरद बारी,कॉ.सचिन फड,कॉ.गिरीष बर्हाटे,कॉ.मनोज जिचकार,कॉ.निखिल पटले,कॉ.संतोष सुर्यवंशी,कॉ.चंद्रकांत कोळी,कॉ.पवन पातालबन्सी,कॉ.विनोद सोनवणे,कॉ.किरण सपकाळे,कॉ.गणेश सातपुते,कॉ.अनिल धोबी,कॉ.कमलाकर काकडे,विनंती बदल्यांच्या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये खदखदत असलेला असंतोष प्रदर्शित करण्याकरीता प्रतिनिधिक स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून दि.१७.१०.२०२२ रोजी बदली करीता इच्छुक असलेलले कर्मचारी,अभियंते व अधिकारी सहभागी झाले होते.
कॉ. देविदास सपकाळे,परिमंडळ प्रसिद्धी प्रमुख जळगाव