नांद्रा येथील तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या शेतातील गोडाऊनवरून सुमारे 18 क्विंटल कापूसवर चोरट्यांचा डल्ला
नांद्रा ता.पाचोरा (प्रतिनिधी) – नांद्रा येथील तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष त्रंबक बाविस्कर यांचे नांद्रा ते पहाण रस्त्याला लागून असलेले शेत गट नंबर 147 या ठिकाणी त्यांनी पत्राचे गोडाऊन शेतीचे अवजारे व शेतीचा माल हाल ठेवण्यासाठी उभारले असून या ठिकाणी त्यांनी त्यांच्या शेतातील सुमारे चार ते पाच दिवस सुरू असलेल्या कापसाच्या वेचा अंदाजे 18 क्विंटल हा त्या गोडाऊनमध्ये कापूस भरला होता दररोज सुभाष त्र्यंबक पाटील हे सुमारे सकाळी सहा वाजता शेतात जातात व रात्रीही उशिरापर्यंत अकरा ते बारा वाजेपर्यंत शेतातच राहतात परंतु दिनांक 16 ऑक्टोबर रोजी ते सकाळी सहा वाजता त्यावेळेस शेतातील गोडाऊन वर गेले त्यावेळेस त्यांना गोडाऊनचे कुलूप तुटलेले व खाली कपाशीचे बोंड पडलेले दिसले त्यामुळे ते भयभीत होऊन आत मध्ये गेले तेव्हा त्यांना शॉकच बसला त्यांनी कष्टाचे घाम गाळून खते कीटकनाशके फवारून वेचणी मजुरी भरून, सुकवून आयता भरलेला सुमारे 18 क्विंटल कापूस मारे पंधरा हजार रुपये क्विंटल भावाने दोन लाख 70 हजारावर चोरांनी त्यावर डल्ला मारला. ही गोष्ट ज्यावेळेस बाहेर गावाला कामानिमित्त त्यांचे तिघ मुलं गेलेले असताना त्यांच्या कानावर गेली त्यांच्या मोठा मुलगा प्रदीप बाविस्कर याला जेव्हा प्रस्तुत प्रतिनिधी प्रा यशवंत पवार यांनी फोन केला त्यावेळी अक्षरशः तो ढसाढसा रडला कारण तो स्वतः दर शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी महागडे औषध मारून व स्वतः पाठीवर पंप घेऊन कष्टाने आज त्यांनी जो कापूसाचा मळा फुलवला होतायाबरोबरच आपल्या वडिलांचे गुडघ्याचे त्रास असतानाही त्यांनी शेतात केलेली वखरणी वेचणी त्यांनी डोळ्याने पाहिली होती त्यांच्या कष्टाचा हा कापूस या चोरट्यांनी मोठ्या धाडसाने चोरी करून नेला होता या अगोदरही त्याच गोडाऊन वरून सुमारे वीस ते पंचवीस हजाराचे संपूर्ण शेतीचे अवजार फिटर मशीन इलेक्ट्रिक मोटर असे साहित्य चोरीला गेले होते परंतु नांद्रा येथे या अगोदरही रस्त्या लागत असणाऱ्या घराजवळून गुरे ढोरे चोरणे, घरातून टीव्ही चोरणे,मोटरसायकल चोरणे अशा घटना घडलेल्या असून पोलिसांसमोर आता मात्र शेतकरी राजाचा कष्टाचा कापूस भर रात्री मोठ्या प्रमाणात चोरून घेऊन जाण्याची ही प्रथमच घटना नांद्रा येथे घडली असल्याने चोर शोधण्याचं व त्याच्या मुस्क्या आवरण्याचं काम आता पोलिसांना जिकरीने करावे लागणार आहे याबरोबरच प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित करणे याबरोबरच शेतातील गोडाऊन वर शेतकऱ्यांनीही रात्रीचा पहारा देणे गरजेचे झाले आहे