गोपीचंद पुना पाटील,महाविद्यालयात बक्षीस वितरण संपन्न…!!!
भडगाव(वार्ताहर)- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,कोळगाव ता.भडगाव येथील गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कला व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने २३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ दरम्यान आयोजित स्व.कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या २१ व्या पुण्यस्मरण सप्ताहाची सांगता तात्यासाहेबांना वंदन व पुजन करुन करण्यात आली,त्यासोबतच आठवडाभर आयोजित विविध स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वती,स्व.तात्यासाहेब,स्व.कमल आजी,स्व.युवराज दादा,स्व.अशोक आण्णा,स्व.साधनाताई आदिंच्या प्रतिमेस पुष्पहार तसेच श्रीफळ वाढऊन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनिल पाटील होते,तर कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संदिप बाविस्कर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्राचार्य सुनिल पाटील यांनी विविध स्पर्धा व कार्यक्रम घेण्याचा मूळ उद्देश व हेतू आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सोनाली सोनवणे,सुत्रसंचलन प्रा.प्रवीण बोरसे यांनी केले तर आभार प्रा.मनोज पवार यांनी मानले.
संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रतापराव पाटील,मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा दुध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनम पाटील यांच्या प्रेरणेतून तथा प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,प्र.प्राचार्य संदिप बाविस्कर,प्रा.रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभर सुंदर अशा विविध स्पर्धा पार पडल्या,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक-शिक्षिका,प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.