महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संयुक्त संघर्ष समिती जळगाव परिमंडळ
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संयुक्त संघर्ष समिती च्या वतीने केंद्र सरकारने व राज्य सरकार ने वीज उद्योग मधील खाजगीकरण व फ्रैचाईझीकरण करून कामगार कर्मचारी अधिकारी अभियंता यांना व सामान्य जनता ग्राहक लघु उद्योग शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलती बंद करण्याची योजना आखली असून सर्वांना देशोधडीला लावण्याचा घाट घातला आहे.
दि.२७/०९/२०२२ रोजी पॉंडेचेरी या केंद्रशासित प्रदेश मध्ये केंद्र सरकारने वीज उद्योग १०० टक्के हिस्सा विकण्यासाठी निविदा प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू केली आहे.संपूर्ण वीज क्षेत्र खाजगीकरण च्या माध्यमातून भांडवलदारांना देण्याच्या पॉंडेचेरी सरकारच्या निर्णयाचा.त्याच्या निषेधार्थ व सदर निर्णय रद्द करण्यात यावा व वीज ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व्हावे यासाठी तेथील स्थानिक वीज कर्मचारी कामगार अधिकारी अभियंता यांचे संयुक्त कृती समिती संघटना नी बेमुदत संप पुकारला आहे.पॉंडचेरी राज्य अंधारात असून बाहेरून अभियंता कर्मचारी आणून खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे मात्र यश आले नाही.२ऑक्टोबर रोजी आंदोलन कर्ते अधिकारी अभियंता कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.त्याला न जुमानता संप आंदोलन सुरू आहे.
पॉंडेचेरी येथे सुरू असलेल्या स़ंपाला देशपातळीवर अभियंता कर्मचारी यांचे नैशनल को ऑर्डीनेशन कमिटी ऑफ ईलेक्ट्रीसिटी एम्प्लॉइज एंड इंजिनिअर्स या संघटनेचे वतीने समर्थन दिले असून देशातील १५ लाख वीज कामगार कर्मचारी अधिकारी अभियंता यांनी पॉंडेचेरी सरकारच्या या निर्णयाला विरोध म्हणून देशभरात निदर्शने करून पाठींबा दिला आहे.
अदानी इलेक्ट्रिकल कंपनी ने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज करून मुंबई लगतच्या प्रदेशात वीज वितरण करण्यासाठी परवाना मिळावा म्हणून मागणी केली आहे.वीज वितरणाचा सर्वांत मोठा महसूल व नफा मिळवून देणारे क्षेत्र ताब्यात घेण्याचा अदानी इलेक्ट्रिकल चा डाव आहे. सहा जलविद्युत केंद्र प्रकल्प खाजगी भांडवलदारांना देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न, महपारेषण मध्ये अदानी चा प्रवेश या सर्वांना विरोध करण्याचा निर्णय संघर्ष समिती ने घेतला आहे.
वरील दोन्ही निर्णय रद्द व्हावे यासाठी आज दि.४ऑक्टोबर रोजी राज्य भर निदर्शने करून काळा दिवस पाळण्यात आला.त्यानिमित्त महावितरण जळगाव परिमंडळ कार्यालय समोर जोरदार निदर्शने करून निषेध व्यक्त करून आज संध्याकाळी ६.१५ वाजता द्वार सभा संपन्न झाली. संघर्ष समिती च्या केंद्रीय नेतृत्वाचे निर्देश नुसार कोणत्याही क्षणी महाराष्ट्र राज्य भरातील वीज कर्मचारी अधिकारी अभियंता अत्यंत तीव्र स्वरूपाच्या आंदोलन च्या तयारी मध्ये असून प्रसंगी बेमुदत संप करण्याचा निर्धार जाहीर करण्यात आला.१९९७ पासून खाजगीकरण विरूद्ध आपला लढा सुरू असून फुटीरतावादी कामगार संघटना पासून कामगार कर्मचारी अधिकारी यांनी सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
सदर द्वार सभा मध्ये महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे परिमंडळ सचिव कॉ.विरेंद्रसिंग पाटील,सबार्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे श्री पराग चौधरी,कुंदन भंगाळे, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस के लोखंडे,बहुजन वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघटनेचे श्री विजय सोनवणे, बहुजन वीज पॉवर कर्मचारी संघटना , महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना यांनी संबोधित करताना सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली.
सदर आंदोलन मध्ये कॉ.प्रकाश कोळी,सागरराज कांबळे, किशोर जगताप, योगेश भंगाळे,मोहन भोई, प्रियतमा बुंदेले, विनोद आनंदा सोनवणे, विशाल पाटील,प्रभाकर महाजन,चेतन नांगरे, संदीप कोळी, राहुल वडनेरे,विजय मराठे, कुंदा धनके, यांनी द्वार सभा यशस्वी होण्यासाठी सहभाग घेतला.