आमदार किशोर पाटील यांची बाबरुड च्या कोविड सेंटर ला भेट!
पाचोरा-भडगाव तालुक्याचे आमदार कीशोर पाटील यांनी शासकीय आयटीआय मधील कोविड केअर सेटंर व ग्रामिण रूग्णालयात भेट घेऊन कोरोना रूग्नांची अस्थेवाईक चौकशी केली. त्याच्यां अडचणी समजुन घेऊन संबधित यंत्रणेला तशा सुचना दिल्या. आमदारांच्या या भेटीने रूग्नांच्या चेहर्यावर समाधान दिसुन आले.
कालही आमदार कीशोर पाटील यांनी तालुक्यातील कोरोना बाधित रूग्नांची भेट घेतली काही रूग्ण हे ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यांवर तेथे उपचार सुरू तर काही रूग्ण हे शासकीय आयटीआय मधील स्थापन करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मधे क्वारांटाइन करण्यात आले आहेत. त्यांनी दोघं ठीकाणी जाऊन प्रत्यक्ष रूग्नाशी संवाद साधला असून त्यांना धीर देत अस्थेवाईक चौकशी केली त्याच्यां समस्या जाणुन घेतल्या रुग्णांना जेवण, नास्ता वेळेवर मिळतो आहे की नाही याची विचारणा केली. त्याबाबत प्रशासनाला सुचना दिल्या याशिवाय प्रशासनाच्या ही त्यांनी अडचणी समजुन घेतल्या यावेळी प्रातांधिकारी राजेंद्र कचरे,नायब तहसिलदार आर.बी.देवकर, वैद्यकीय अधिकारी डाॅ.पंकज जाधव, डाॅ.प्रतिक भोसले आदि उपस्थित होते.