गोपीचंद पुना पाटील महाविद्यालयात “देशभक्तीपर गीतगायन” व “कथाकथन” स्पर्धा संपन्न …!!!!
कोळगाव ता-भडगाव- कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय आणि कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगाव, यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.तात्यासाहेब हरि रावजी पाटील पुण्यस्मरण सप्ताहानिमीत्त आज रोजी “देशभक्तीपर गीतगायन” तथा “कथाकथन” स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल पाटील,क.म.कार्यवाहक प्रा.रघुनाथ पाटील,प्रा.किशोर चौधरी आदि उपस्थित होते.
कथाकथन स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे….!!!
(कनिष्ठ महाविद्यालयीन विभाग)
प्रथम – कु.प्रियंका पाटील
द्वितीय- कु.अरुणा जाधव
(वरिष्ठ महाविद्यालयीन विभाग)
प्रथम – कु.प्रियंका पाटील
द्वितीय – चि.तुषार पाटील
देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचा खालीलप्रमाणे….!!!!!
(कनिष्ठ महाविद्यालयीन विभाग)
प्रथम – कु.अक्षदा पाटील
द्वितीय – कु.योगीता परदेशी
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.धनश्री देसले यांनी केले तर आभार कु.प्रियंका पाटील हिने मानले.
सदर स्पर्धेसाठी प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,प्र.प्राचार्य संदीप बाविस्कर,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा समितीतील प्रा.किशोर चौधरी,प्रा.माया मराठे,प्रा.मनेष पाटील,प्रा.प्रविण निकम,प्रा.मनोज पाटील यांनी विशेष मेहनत घेतली,त्यांना महाविद्यालयातील इतर सहकारी शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले.