कजगाव अवैध धंदे विरोधात मुख्यमंत्री सह अधिकारयाकडे तक्रार = ग्रामपंचायत सदस्य अनिल महाजन
(कजगाव प्रतिनिधी) कजगाव ता.भडगाव जिल्हा जळगाव येथील ग्रामपंचायत सदस्य आनंदा पांडुरंग महाजन यांनी तक्रार केली आहे. कजगाव बसस्थानक परिसरात,सावता माळी चौक येथे राजरोसपणे अवैध धंदे सुरू असुन त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तसेच गावातील अनेक नागरिक हे अवैध धंद्यात सामील होत असुन त्याचे संसार उद्धवस्त होत आहे.कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे गावातील ग्रामस्थांची अथिॅक परिस्थिती हलाखीची झाली असून या अवैध धंदयामुळे जो काही मोलमजुरी करून पैसा येतो ते सुद्धा लोक अवैध धंद्यात मध्ये खर्च करीत असल्याने व्यसनाधीनता वाढली आहे.या संदर्भात कुणीही तक्रार देण्यासाठी धजावत नाही.कजगाव येथील जेष्ठ नागरिक गनी इस्माईल मन्यार यांनी भडगाव पोलिस निरीक्षक यांना अवैध धंदे संदर्भात वारंवार तक्रारी अर्ज देऊन सुद्धा आजपावेतो तुटपुंज्या कारवाई करुन पोलीस निरीक्षक यांनी जेष्ठ नागरिक गनी मन्यार यांचा अवमान केला आहे.अवैध धंदे वाले लोकांमध्ये गैरसमज पसरवित आहे पोलिसांची कारवाई होणार नाही . आम्ही पोलीसांना दर महिन्याला ३ ते ४ लाख हप्ता देतो.पोलिसांची काय हिंमत ते आमच्यावर कारवाई करतील असे बोलून नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करतात.पोलिस प्रशासनामुळे गरीब नागरिकांच्या विश्र्वासाला तडा गेला असुन पोलिसांची प्रतिमा मलीन होत आहे.पोलिस याबाबत कुठलीही कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये विश्र्वास निर्माण झाला की पोलिस हप्ता घेत आहेत अशी चर्चा कजगाव नागरिकांमध्ये सद्या
सुरू असल्याचे कळते.
कजगाव अवैध धंदयाचा बाजार बंद करावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा कजगाव येथील ग्रामपंचायत सदस्य आनंदा महाजन यांनी म्हटले आहे.तक्रार राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक, जिल्हा अधिकारी जळगाव, पोलिस अधीक्षक जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव, भडगाव पोलिस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.