सोशल मिडीयाच्या माध्यमातुन भडगांव तालुक्यातील एकवटला मराठा समाज
अखिल मराठा समाजाची भडगांव तालुक्याची प्राथमिक स्वरुपात चर्चा विनिमय करण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन आवाहन करुन शासकीय विश्रामगृह भडगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व प्रथम जगतगुरु संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन व मराठा समाजाचे नेते विनायकजी मेटे साहेब यांना श्रध्दांजली अर्पण करुन बैठकीस सुरवात करण्यात आली. यात प्रामुख्याने समाज संघटन, समाज एकत्रिकरण, शैक्षणिक, सांस्कृतिक वारसा, जपत समाजातील सर्व घटकांचा संघटीत पणे विकास करणे, तरुणांना नोकरी, व्यवसायाचे मार्गदर्शन , नव तरुणांना बेरोजगारी तुन मुक्त कसे करता येईल,तालुक्यात गाव तेथे समाज कार्यकारणी तयार करुन समाजाला एका छताखाली एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणे, मराठा समाजातील गट-तट उच्च -निच्च भेदभाव न करता मराठा म्हणुन सर्व समाज एकत्रित करुन समाज संघटन करण्या बाबतीत चर्चा करण्यात आली. यावेळेस पाचोरा तालुक्यातून ज्यांनी अखिल मराठा समाज एकत्रिकरण व संघटन साठी सुरुवात केली असे संजय आधार पाटील, यांनी पहिले पाचोरा तेथे सुरवात केली नंतर भडगाव व ग्रामीण सुरु केले त्यात त्यांना डॉ. योगेश पाटील सर,यांचे मोलाचे मार्गदर्शक मिळाले आहे या प्रसंगी चिंतामण पाटील, अॅड. दिपक पाटील गाळण, सचीन दादा सोमवंशी, किशोर पाटील, विकास पाटील, चंदु सोमवंशी, तसेच भडगांव तालुक्यातून डॉ, निळकंठ पाटील संभाजी भोसले, डी. बी. पाटील, मच्छिंद्र पाटील, राकेश सोनवणे सर, योजना ताई पाटील, सौ, मीना ताई अशोक बाग मॅडम, जे, के, पाटील भरत पाटील निपाने शेखर पाटील गाळन दीपक पाटील वाक अनिल पाटील शिंदी प्रदीप पाटील डी, डी, पाटील सर भडगाव व भडगाव शहर ग्रामीण वाक, पांढरद, आमडदे ,वडजी ,बोदरडे, कोठली ,पिचरडे ,कोळगाव ,जुवार्डी ,शिंदी , वलवाड़ी ,बात्सर, महिंदळे निपाने अंजनविहिरे ,गिरड ,बाळद,गाळन यांच्यासह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.