गोपीचंद पुना पाटील,महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन
कोळगाव (भडगाव) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून इयत्ता पाचवी ते बारावी वर्गांमध्ये तीन गट पाडून आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते,यात एकूण १६४ विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.
आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदरणीय प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी स्थानिक शाळा समितीचे युवराज पाटील,संजय पाटील,संभाजी देसले,पालक प्रतिनिधी नाना पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संदीप बाविस्कर,कार्यवाहक रघुनाथ पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयातील राहुल मोरे या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तूंपासून पिकांचे नुकसान करणाऱ्या पक्षांना पळविण्यासाठी बनविलेल्या उपक्रमास कार्यक्रमाचे उद्घाटक प्रतापराव पाटील यांनी प्रत्यक्षात हाताळून औपचारिक उद्घाटन केले,व्ही.पी.सोनवणे यांनी केलेल्या फलक लेखनाने उपस्थितांची दाद मिळविली.
तद्नंतर विज्ञान प्रदर्शन आयोजीत केलेल्या दालनाचे फीत कापून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले,विज्ञान प्रदर्शनात सिमा शिसोदे,सरिता पाटील,प्रा.प्रविणा पाटील,एस.एन.पाटील यांनी परिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल नेरपगार,सुत्रसंचलन एस.ए.वाघ,आभार राहुल सोनवणे यांनी केले.
विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी प्राचार्य सुनिल पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिमा शिसोदे,दिनेश राजपूत,राहुल नेरपगार आदि व इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.