मतिमंद बालकांच्या मनगटावर रोटरी क्लब चे अनोखे भाव बंधन
पाचोरा (प्रतिनिधी)
येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव तर्फे शहरातील कालिंदीबाई पांडे मतिमंद विद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. डॉ.आनंद झुनझुनवाला व असिस्टंट गव्हर्नर रो. विकास पाचपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भाव बंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष रो.डॉ. अमोल जाधव, सेक्रेटरी गोरखनाथ महाजन, प्रकल्प प्रमुख रो.डॉ. स्वप्नील पाटील, गाडगेबाबा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षीताई पांडे सेक्रेटरी श्री प्रदीप पांडे प्रशासकीय अधिकारी निलेश पांडे उपस्थितीत होते.
या प्रसंगी सौ. मोनिका झुनझुनवाला, सौ. सुनीता पाचपांडे, डॉ. वैशाली जाधव, सौ. वर्षा पाटील व रोटरी परिवारातील भगिनींच्या हस्ते मतिमंद बालकांना रक्षाबंधन करण्यात आले. विशेष म्हणजे मतिमंद बालकांनी तयार केलेल्या सुंदर व आकर्षक राख्या या रक्षाबंधन यासाठी वापरण्यात आल्या.
या कार्यक्रमाला डॉ पंकज शिंदे, भरत सिनकर, चंद्रकांत लोढाया, शिवाजी शिंदे, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.किशोर पाटील, डॉ. बाळकृष्ण पाटील, दीपक पाटील यांचेसह अनेक रोटरी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय गरये यांनी केले, संजय राजगुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरेखा जोशी, आबाराव महाले, राजेंद्र महाजन, जगदीश पाटील आदींनी परिश्रम घेतले.