पाचोरा रोटरी क्लब तर्फे मोफत कापडी पिशव्यावाटप
पाचोरा (प्रतिनिधी)…
येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव यांचे तर्फे “प्लास्टिक मुक्त पाचोरा मोहीम” हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून दिनांक 20 रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील, हुतात्मा स्मारकाच्या प्रवेशद्वाराजवळ ५०० कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डॉ. आनंद झुनझुनवाला यांच्या हस्ते “प्लास्टिक मुक्त पाचोरा” मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
“आता तरी सावध होऊ या’
“संपूर्ण प्लास्टिक बंद करूया”
या घोषवाक्या ने मोहिमेला सुरुवात झाली. या प्रसंगी उपप्रांतपाल विकास पाचपांडे, उपप्रांतपाल राजेश बाबूजी मोर, उपप्रांतपाल प्रदीप पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ अमोल जाधव, सेक्रेटरी गोरखनाथ महाजन, प्रकल्प प्रमुख रो.डॉ.अजय सिंग परदेशी, तसेच उपस्थित रोटेरियन बांधवांच्या हस्ते सुमारे 500 कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
विशेष म्हणजे उपप्रांतपाल विकास पाचपांडे यांनी भुसावळ येथून एका गरजू व होतकरू परिवाराकडून या 500 पिशव्या बनवून आणल्या होत्या.
याप्रसंगी रो. शैलेश खंडेलवाल, रो.डॉ. बाळकृष्ण पाटील, रो.डॉ. विशाल पाटील, डॉ. वैशाली जाधव, सौ वर्षा पाटील, रो.रावसाहेब पाटील, रो. भारत सिनकर, रो. चंद्रकांत लोढाया, प्रा. शिवाजी शिंदे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ.स्वप्नील पाटील, दीपक पाटील पवन पाटील पंकज शिंदे मनोज केसवानी, जयेश पाटील आदी रोटरी सदस्य उपस्थित होते