रेल्वे सल्लागार सदस्य दिलीप पाटील यांच्या प्रयत्नांनी बहुचर्चित भुसावळ देवळाली शटल पुन्हा सुरु होणार

रेल्वे सल्लागार सदस्य दिलीप पाटील यांच्या प्रयत्नांनी बहुचर्चित भुसावळ देवळाली शटल पुन्हा सुरू,

पाचोरा : प्रतिनिधी २० वर्षापासून सुरू असलेली भुसावळ देवळाली शटल ही कोरोना काळात २ वर्षांपासून बंद करण्यात आली होती, यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होते, ग्रामीण प्रवाशांची संपूर्ण गैरसोय होऊन प्रवासी, अपडाऊनर्स, व्यावसायिक, नोकरदार रडकुंडीला आले होते,

रेल्वे सल्लागर दिलीप पाटील, पाचोरा
9028722878
ही ट्रेन सुरू व्हावी अशी सर्व स्तरातून मागणी होत असतानाच रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्याचे कोणतीही संकेत दिसत नसल्यामुळे उच्चस्तरावर लोकप्रतिनिधींकडे, भुसावळ मंडळाचे रेल्वे सल्लागार सदस्य दिलीप पाटील यांनी वारंवार आपल्या ट्रेन लाईव्ह प्रवासी संघटने मार्फत व नुकतीच संपन्न झालेल्या १४ जुलै २०२२ रोजीच्या रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करून ही ट्रेन तात्काळ सुरू करावी याबाबत प्रश्न जोरदार उपस्थित केला होता, यावेळी आपल्याकडून या प्रस्तावाचे स्वागत असून ही ट्रेन सुरू करण्याबाबतचा आपल्याकडील प्रस्ताव उच्चस्तरावर पाठवण्यात येतोय व लवकरच ही समस्या मार्गी असे भुसावळ मंडळाकडून लागेल असे सांगण्यात आले होते, ही ट्रेन सुरु होण्याबाबतचे पत्र नुकतेच प्राप्त झाले असून, ही भुसावळ देवळाली पॅसेंजर आता सुरू होत आहे, या ट्रेनचा नवीन ट्रेननंबर ११११३ देवळाली भुसावळ तर ११११४ भुसावळ देवळाली पॅसेंजर ट्रेन एक्सप्रेस स्वरूपाच्या १२ बोग्यांसह धावेल, या ट्रेनची प्रथम फेरी भुसावळ येथून देवळाली साठी १६ सप्टेंबर २०२२ रोजी प्रवासासाठी निघेल तर १७ सप्टेंबर २०२२ या तारखेला देवळालीहून भुसावळ कडे परतीचा प्रवास करेल यापासून दररोज ही ट्रेन धावेल,

ही ट्रेन देवळालीहून सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी भुसावळकडे निघेल तर १२ वाजून २० मिनिटांनी भुसावळ येथे पोहचेल, तसेच भुसावळ हून ५ वाजून ३० मिनिटांनी देवळाली कडे निघेल तर १० वाजून ४५ मिनिटांनी देवळाली येथे पोहचेल, ही ट्रेन सुरू होत असल्याने प्रवासी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असून यापुढे कोणतीही ट्रेन बंद होऊ देणार नसल्याचे ट्रेन लाइव प्रवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रेल्वे सल्लागार समिती सदस्य दिलीप पाटील यांनी सांगितले.