🌈पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज 🇮🇳हर घर तिरंगा🇮🇳 अभियानांतर्गत इ.1ली व इ.2 री च्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा व इ.3 री व इ.4 थी च्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना 🖌️🎨रंग भरण व रांगोळी स्पर्धेसाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची थीम देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने सुंदर-सुबक असे रंगभरण व रांगोळी काढून उपस्थितांची मने जिंकलीत.प्रसंगी पाचोरा पंचायत समितीच्या विस्ताराधिकारी मा. सरोज गायकवाड मॅडम उपस्थित होत्या.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.