जिल्हा परीषद उर्दू शाळेत, अजादी का अमृत महोत्सव साजरा
संपूर्ण देशात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याची 75 वी वर्धापन दिवस साजरा करण्याची सुरुवात झालेली आहे. या वर्धापन दिवसाला संस्मरणीय बनवण्यासाठी भारत सरकार *आजादी का अमृत महोत्सव अभियान* चालवत आहे. या अभियानाची सुरुवात *हर घर तिरंगा* कार्यक्रमातून सुरू झाली. विद्यार्थी व लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करण्यासाठी जि.प.उर्दू कन्या शाळा पाचोरा, व जि.प.उर्दू मुलांची शाळा पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने अनोखा उपक्रम राबवण्यात आला. सकाळी सात वाजता गावात प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी *मेरा देश मेरी शान,हर घर तिरंगा अभियान* ,” *हर घर तिरंगा,घर घर तिरंगा”* *”our nation, our pride* असे घोष वाक्य दिले. विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा मध्ये सहभाग घेतला. कार्यक्रम मध्ये उर्दू केंद्रप्रमुख सलाउद्दीन मोहम्मद गौस, जिल्हा परिषद उर्दू मुलींची शाळा चे मुख्याध्यापक एजाज रउफ बागवान, जि.प.मुलांची शाळाची मुख्याध्यापिका शाहीन बानो, पदवीधर शिक्षक शेख कदिर शब्बीर, उपशिक्षक शेख जावेद रहीम, तहसीन अहमद, इसराइल खान, उपशिक्षिका शाहेदा पटवे, शाहेदा हारून, माजेदा अंजुम, शाईस्ता देशमुख, सलमा कौसर यांनी परिश्रम घेतला.