स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास श्री गो से हायस्कूल मध्ये ‘हर घर तिरंगा’ रॅलीने प्रारंभ

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास श्री गो से हायस्कूल मध्ये ‘हर घर तिरंगा’ रॅलीने प्रारंभ


पाचोरा ( प्रतिनिधी)
आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी शासकीय निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास प्रारंभ झालेला असून गो से हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ चा नारा देत प्रत्येक भारतीयाने स्वतःच्या घरावर ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ प्रसंगी तिरंगा फडकविण्याचे आवाहन रॅलीतून करण्यात आले. रॅली ची सुरुवात मुख्याध्यापक सौ पी एम वाघ यांनी विद्यार्थ्यांना विविध सूचना देऊन गो से हायस्कूल येथून केली. याप्रसंगी पर्यवेक्षक आर. एल .पाटील ,एन. आर .ठाकरे , ए बी अहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर .बी .तडवी, सौ सी एल जाधव, सौ ए व्ही पाटील ,सौ एम आर सोमवंशी, सौ स्मिता सोनवणे इत्यादी उपस्थित होते. सदर रॅली यशस्वी करण्यासाठी एम .जे. चिंचोले , एल टी पाटील, एम .आर देवरे , स्वप्निल जाधव , सिद्धांत जगताप यांनी सहकार्य केले. सदर रॅली गो से हायस्कूल मधून पुनगाव रोड मार्गे रिंग रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक ,कृषी उत्पन्न बाजार समिती मार्गे येऊन पुन्हा गो से हायस्कूल येथे विसर्जित करण्यात आली यावेळी परिसरातील देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या .