माजी मंत्री के.एम. बापू पाटील यांच्या स्मृतीला उजाळा
पाचोरा (प्रतिनिधी)
तालुक्यातील शिक्षण, सहकार व कृषीमहर्षी तथा माजी मंत्री बापूसाहेब के. एम. पाटील यांना त्यांच्या 23 व्या पुण्यतिथीनिमित्त नुकतेच अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचालित स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयात संपन्न एका कार्यक्रमात बापूसाहेबांच्या स्मृतीला उजाळा मिळाला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पाचोरा तालुक्याचे माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री के बापू पाटील हे एक लोकप्रिय नेतृत्व म्हणून राज्याला सुपरिचित होते. माजी मंत्री बापूसाहेब के. एम. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्व. कालिंदीबाई पांडे मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी स्वर्गीय बापूसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून बापूंच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना विविध मान्यवरांनी बापूसाहेबांच्या जीवनचरित्रातील आठवणींना उजाळा दिला.
बापूसाहेब यांचे सुपुत्र अनिल पाटील यांनी बापूसाहेब के. एम. पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कार्यकर्तुत्वाचा गौरव यावेळी केला. बापूसाहेबांचे नातू जयदेव पाटील यांनी आपल्या मनोगतात बापूसाहेबांनी मतदार संघात केलेल्या जलसंधारणाच्या कामाचे स्मरण करून दिले. तसेच तालुक्यातील रोजगार व कष्टकरी जनतेच्या हाताला काम मिळावे यासाठी बापूसाहेबांनी केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. शरद बापू पाटील यांनी आपल्या मनोगतात बापू साहेबांविषयी च्या विविध आठवणींना उजाळा दिला. स्वर्गीय कालिंदी बाई पांडे मतिमंद विद्यालयात तर्फे सुद्धा बापूसाहेबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
मतिमंद विद्यालयातील बालकांना देवरे परिवार, वाडी- शेवाळे यांचेकडून मिष्टान्न भोजन देण्यात आले. तसेच बापूसाहेबांच्या स्मरणार्थ मतिमंद विद्यालयाच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी अनिल दादा पाटील, रवींद्र भाऊ पाटील, शरद बापू पाटील, जयदेव पाटील, दिगंबर नथू पाटील, हिरामण पाटील, संजय पाटील, डी.बी. बापू पाटील, दिनकर दादा पाटील, प्रकाश पाटील, एकनाथ पाटील, पुंडलिक पाटील, निश्चल पाटील, दिनकर पाटील, सुभाष रामजी पाटील, बाबुराव विठ्ठल पाटील, भागवत पाटील, योगेश पाटील, भूषण बोरसे, सचिन देवरे, संदीप पवार, यासह ह् अन्य मान्यवर तसेच विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.