नवजीवन विद्यालय पाचोरा येथे मुली वयात येताना कार्यक्रम संपन्न झाला.
सर्वप्रथम रवींद्र चौधरी सरांनी मेंदू खाली असलेल्या पियुषिका ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या श्रावामुळे शारीरिक आणि मानसिक बदल होतात हे सांगितले.
मानसिक बदलात चिडचिड होणे, कमी बोलणे, भिन्नलिंगी आकर्षण, श्री सुलभ लज्जा येणे यासारखे मानसिक बदल दिसून येतात. विशेष बाब म्हणजे या वयात असणारे भिन्न लिंगी आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे ही एक नैसर्गिक प्रक्रिया त्यातून बाहेर पडण्यासाठी वाचन करणे विविध छंद जोपासणे हे उपाय सांगितले. त्यानंतर डॉक्टर माधुरी चौधरी श्री रोग तज्ञ पाचोरा यांनी मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल मासिक पाळी याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले तसेच मासिक पाळी विषयी असलेले गैरसमज वैज्ञानिक मार्गदर्शन करून दूर केले. तसेच आपल्या शरीराला कोणी स्पर्श करत असेल तर तो चांगला की वाईट कसे ओळखावे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे आभार सौ एस एम भदाणे मॅडम यांनी मांनले.