पाचोऱ्यात ग.स.च्या ज्येष्ठ सभासद सन्मान सोहळा उत्साहात
पाचोरा – जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लिमिटेड, जळगाव म्हणजेच ग.स. सोसायटीच्या ज्येष्ठ सभासदांचा सन्मान सोहळा दिनांक 10 जुलै रोजी, सकाळी 11 वाजता श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाला. ग.स. पतपेढी च्या सहकार गटाचे श्रेष्ठी श्री व्ही. झेड. बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न या ज्येष्ठ सन्मान सोहळ्यात 75 जेष्ठ सभासदांना धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री गो. से. हायस्कूल च्या ड्रॉईंग हॉल मध्ये संपन्न या कार्यक्रमाला ग. स. पतपेढीचे अध्यक्ष उदयबापू पाटील, उपाध्यक्ष रवींद्र (भाऊसाहेब) सोनवणे, कर्ज समिती अध्यक्ष योगेश इंगळे, गटनेते अजबसिंग पाटील, संचालक महेश विठ्ठलराव पाटील, ज्ञानेश्वर रूपचंद सोनवणे, संचालक प्रदीप सोनवणे, श्री गो. से. हायस्कूल चे मुख्याध्यापक सुधीर पाटील, जागृती हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक गोकुळ पाटील व प्रवीण आत्माराम पाटील मंचावर उपस्थित होते.
सरस्वती पूजन व माजी आमदार ओंकार आप्पा वाघ यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ग. स. पतपेढीचे लेखापाल शामकांत सोनवणे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगतीचा आढावा सादर केला. ज्येष्ठ सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे, अध्यक्ष उदय बापू पाटील यांची समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही. झेड. बापू पाटील यांनी सर्व जेष्ठ सभासदांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्यात.
यावेळी ग.स. पतपेढी पाचोरा शाखा 1 मधील 17, शाखा नंबर 2 मधील 37, व शाखा नंबर 3 मधील 22 ज्येष्ठ सभासद सभासदांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाचोरा शाखांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकार शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी व्यवस्थापक वाल्मिक पाटील,
श्री नितीन शालेग्राम सोनवणे, (शाखाधिकारी पाचोरा नंबर 1), श्री किरण सदाशिव पाटील (उपशाखा अधिकारी शाखा पाचोरा नंबर), श्री सुरेश वसंत वाघ (उपशाखा अधिकारी पाचोरा शाखा नं 3) श्री कुणाल पाटील (रोखपाल), श्री प्रमोद शरद साळुंखे (रोखपाल,) श्री योगेश चंद्रकांत शेलार (रोखपाल) व कर्मचारी वृंद श्री योगेश साहेबराव पाटील, श्री सतीश सुरेश साळुंखे, श्री संजय हिरालाल पाटील,
आदींनी परिश्रम घेतले .आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर व सभासदांना फराळ , फलाहार व चहापान देण्यात आले.