‘ईडी’सरकार ओबीसी बांधवांना न्याय देणारच-आनंद रेखी
राज्यातील सर्वसामान्यांना इंधन दरवाढीतून ही दिलासा मिळणार
मुंबई
हिंदुत्वाच्या मुद्दयावर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी-शिवसेना राज्यात एकत्रित आली आहे. हे सरकार सत्तेत आल्याने सर्वसामान्यांसह इतर मागासवर्गीय (ओबीसी) बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवण्याचा मार्ग या सरकारमुळे सुकर झाला असल्याची भावना भाजप नेते आनंद रेखी यांनी मंगळवारी व्यक्त केली. नुकतीच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून ओबीसी आरक्षण, इंधनावरील कर कपातीसह इतर मुद्यांवर चर्चा केली.
अवघ्या काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येवून ठेपला आहेत. पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात राज्यातील आरक्षणासंबंधी सुनावणी होण्याची शक्यता आहे. पदाची जबाबदारी सांभाळताच मा.फडणवीस साहेबांनी उच्चस्तरीय बैठक बोलावून ओबीसी आरक्षणासंबंधी चर्चा करीत संपूर्ण आढावा घेतला.ओबीसी आरक्षण लागू व्हावे यासाठी अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना देखील दिल्या.ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षणासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील ते सर्व करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मा.फडणवीस साहेबांच्या कर्तव्यदक्षतेमुळे आता मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातील ओबीसींना देखील न्याय मिळेल,असे रेखी म्हणाले.’इम्पीरीकल डेटा’ गोळा करण्याच्या प्रक्रियेला देखील नवीन सरकारने वेग दिला आहे.त्यामुळे निवडणुकांच्या पूर्वीच हा डेटा न्यायालयासमोर सादर करू आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल,असा विश्वास रेखी यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल,डिझेलवरील अबकारी कर कमी केल्यानंतर देखील तत्कालीन ठाकरे सरकारने जीएसटी परतावा दिला नसल्याची सबब पुढे करीत इंधनावर कर कपात करण्यास नकार दिला होता.त्यामुळे इतर राज्यात इंधनावर झालेली १५ ते २० रुपयांच्या कपातीपासून महाराष्ट्रवासिय मुकले होते.आता ‘ईडी’ सरकारमुळे इंधनदरवाढ देखील कमी होईल आणि महागाईने मेटाकुटीला आलेली जनतेला दिलासा मिळेल,असे रेखी म्हणाले.
—-