योजना समजली तरच लाभार्थी पुढे येतील खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन

योजना समजली तरच लाभार्थी पुढे येतील
खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन
———————————-
प्रधानमंत्री जनकल्याण जत्रेच्या “सात एलईडी व्हॅन” आणि “सात जनजागृती चित्ररथां”चा शुभारंभ
————————————-
चाळीसगाव — स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव आपण साजरा करतो आहोत. अनेक योजना या लोकप्रिय झाल्या मात्र अनेक योजना या लाभार्थ्यांचे जनकल्याण आत्मनिर्भर होण्यासाठी पुरक असताना त्या योजनेबद्दल गैरसमज आहे. योजना न समजता पाठपुरावा केला तर पदरी निराशा येते. त्यामूळे योजनेचा उद्देश सफल होत नाही.त्यामुळे लाभार्थी वंचित राहतात. ही बाब आमदार असताना अभ्यासली आणि लाखो लोकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासकीय योजनांची जत्रा भरविली.त्याच धर्तीवर पुन्हा एकदा शासनाच्या शेकडो योजना असल्या तरी खऱ्या अर्थाने शेतकरी, युवा, महीला, ज्येष्ठांच्या आरोग्य ते आत्मनिर्भर तसेच विमा ते उद्योग अशा ७५ योजनांचे माहिती पत्रक आपल्या हाती दिले आहे.या केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी 75 योजनाचे 75 स्टॉल उभारून 75 योजना दुतांच्या माध्यमातून 75 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी जळगाव लोकसभा मतदार संघातील *प्रत्येक विधानसभा क्षेत्रात,एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच छताखाली, प्रधानमंत्री जनकल्याण जत्रेचे आयोजन* करण्यात येणार असून या *जनजागृतीसाठी सात जनजागृती एलईडी व्हॅन*
व *सात जनजागृती चित्ररथांचा शुभारंभ* आपल्या सर्वांच्या साक्षीने करत असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज येथे केले.
प्रधानमंत्री जनकल्याण जत्रेच्या अनुषंगाने व खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन चाळीसगाव येथील राजपूत मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.
यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते. *सुरुवातीला योजनांच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या* हस्ते करण्यात आले
याप्रसंगी भाजपचे राज्य प्रवक्ते संजय शर्मा, योगाचार्य वसंतरावजी चंद्रात्रे, पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करण दादा पवार, युवा नेते अमोल भाऊ शिंदे, जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, नगराध्यक्ष आशालता चव्हाण, नांदगाव नगराध्यक्ष राजेश दादा कवडे, मराठा क्रांती मोर्चा धुळे जिल्हा सेक्रेटरी निंबा नाना मराठे,जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, भाजप तालुका अध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, माजी पंचायत सभापती संजय पाटील, पालिकेतील गटनेते संजय आबा पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजू आण्णा चौधरी ग्रामसेवक संघटनेचे राज्य पदाधिकारी संजीव निकम, जीप सदस्य धर्माआबा वाघ, उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका संपदाताई पाटील ,माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे,तालुका सरचिटणीस अमोल नानकर, जितेंद्र वाघ,अमोल चव्हाण, धनंजय मांडोळे, गिरीश ब -हाटे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब बागुल,नगरसेवक नितीन पाटील, चिराग शेख, सोमसिंग राजपूत, चंद्रकांत तायडे, अरुण अहिरे, विजय प्रकाश पवार, विजया भिकन पवार,माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, मुख्याध्यापक रमेश सोनवणे, विवेक चौधरी, माजी उपसभापती भाऊसाहेब पाटील, मार्केट संचालक विश्वजीत पाटील, पत्रकार संघाचे एम. बी. पाटील,विश्वासराव चव्हाण, नमोताई राठोड, सदानंद चौधरी,राजेंद्र पगार ,बबन पवार, प्रदीप राजपूत रवींद्र चौधरी तरवाडे, प्रकाश पवार , मिनाताई महाजन, पद्माकर दादा पाटील, जगत बापु अहिरराव, भैय्यासाहेब पाटील,सुवर्णाताई राजपूत,सौरव पाटील , पप्पू राजपुत, चेतन वाघ,आदर्श शिक्षक पवार गुरुजी, प्रवीण पाटील वाघडूकर, सुभाष पाटील, एड. राजेंद्र सोनवणे यांच्यासह विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला या सर्व चित्ररथांना खासदार उन्मेश दादा पाटील व उपस्थित पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

*जनसेवेची तळमळ असलेले नेते*
*संजय शर्मा*
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रती प्रेम असलेल्या, अठरा तास कामाची तळमळ, धडपडीने मी प्रभावी झालो असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणून मी उन्मेश दादा पाटील यांचा उल्लेख करावा लागेल. संसदेत सर्वाधिक प्रश्न मांडणारा…सर्वाधिक चर्चासत्रात भाग घेणारा..ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, जल, जमीन,जंगल,कृषी, शेतकरी, युवा, महिला
सर्व घटकांच्या लोककल्याणाच्या विषयांना सभागृहात वाचा फोडणारे “युवा उत्कृष्ट संसदपटू”
म्हणून खासदार उन्मेश दादा पाटील यांचा गौरव करावा लागेल अशी भावना भाजपचे राज्य प्रवक्ते संजय शर्मा यांनी यावेळी व्यक्त केली.

*अठरा तास काम करणारा नेता*
*करन दादा पवार*
उन्मेश दादा पाटील यांची माझी मैत्री ही दादा आमदार होण्या अगोदरपासून आहे. जनतेच्या कल्याणाचा ध्यास असलेला, योजनांची सखोल माहिती ठेवणारा व जनतेच्या कल्याणासाठी अठरा तास करणारा नेता आम्हाला लाभला आहे याचा आनंद असल्याची भावना पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करन दादा पवार यांनी व्यक्त केली.

*गिरणेचे खरे सुपुत्र उन्मेशदादा*
*अमोल भाऊ शिंदे*
खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या विविध उपक्रमांचा मी फॅन आहे. मी आमदार होण्यासाठी या सर्व उपक्रमांची माहिती घेऊन माझ्या तालुक्यात हे उपक्रम राबवले आहेत. माझा अवघ्या काही मतांनी पराभव झाला असला तरी दादा यांच्या सोबत राहून नवीन उभारी घेतली आहे. त्यांचा हात माझ्या पाठीवर सदैव आहे. दादांनी गिरणा परिक्रमा करण्याचा निर्णय घेतला ती नियोजनाची बैठक सुमारे अठरा तास चालली.दादांनी चारशे किलोमीटर पायी चालण्याचा निर्णय घेऊन एक जानेवारीला भर उन्हात परिक्रमेस सुरुवात केली. दादा आपण ठरवलं ते करण्याची आपली वृत्ती आहे.आम्ही सर्व आपल्या धडपडीचे अनुयायी आहोत. तुमच्या सारखा काम करणारा मोठा बंधू मिळाल्याचा अभिमान असल्याची भावना युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी ग्रामसेवक संघटनेचे संजीव निकम यांनी मनोगत व्यक्त केले.ग्रामसेवक बंधूंच्या पाठीशी उभे राहणारे राज्यातील एकमेव नेतृत्व म्हणून आम्ही उन्मेश दादा पाटील यांचा आम्हाला अभिमान आहे.
माजी सभापती संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे यांनी तर सूत्रसंचालन दिनेश बोरसे, अमोल नानकर यांनी केले.