इंडिया फोर्ब्ज ने घेतली डॉ.भूषण मगर यांच्या कार्याची दखल
पाचोरा-
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णसेवेचा मानबिंदू असलेले विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर पाटील यांच्या कार्याची दखल “इंडिया फोर्ब्ज” या आंतरराष्ट्रीय इंग्रजी नियतकालिकाने घेतली आहे. इंडिया फोर्ब्ज च्या 3 जून च्या अंकामध्ये (पृष्ठ43 वर) “विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डिलिव्हरिंग अफोर्डेबल, कॉलिटी हेल्थकेअर सर्विसेस अप टू द लास्ट पर्सन ऑफ सोसायटी” या शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध केला आहे. या लेखांमध्ये विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या माध्यमातुन डॉ. भूषण मगर -पाटील यांच्या समग्र रुग्णसेवेचा गौरव केला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या समाजाभिमुख डॉक्टरची दखल पहिल्यांदाच इंडिया फोर्ब्ज या इंग्रजी नियतकालिकाने घेतली आहे. यानिमित्ताने डॉ.भूषण मगर पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोरोना महामारी च्या प्रारंभीच्या गोंधळलेल्या स्थितीत स्वतःचे हॉस्पिटल शासनाला हस्तांतरित करणारे महाराष्ट्रातील सर्वात पहिले कोरोना योद्धा म्हणून डॉ.भूषण मगर पाटील ओळखले जातात. कोरोना काळात स्वतःच्या 3 हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी सुमारे 3500 रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. याशिवाय 1200 रुग्णांवर मोफत उपचार करून आपली सामाजिक बांधिलकी व रुग्ण सेवेबद्दलची कणव प्रदर्शित केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले कोरोना रुग्ण पाचोरा येथे उपचार घेऊन बरे झाले आहेत. कोरोना च्या अत्यंत भयावह वातावरणात अहोरात्र रुग्णसेवा करीत असतानाच त्यांनी पंचक्रोशीतील अनेक वैद्यकीय व्यवसाय व हॉस्पिटलला मार्गदर्शन केले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्यभरातील अनेक संस्था, संघटना, वृत्तपत्रे, चॅनल्स, पक्ष-संघटना आदींनी त्यांना वेगवेगळे पुरस्कार व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवले आहे.
पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीलगत ‘पाचोरा सेंट्रल’ च्या इमारतीत असलेल्या अतिभव्य विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. अत्याधुनिक उपचार पद्धती, उच्चशिक्षित, तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स, उच्च दर्जाच्या अत्यावश्यक सेवा सुविधा विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये पुरवल्या जातात.
डॉ भूषण दादा म्हणतात.
इंडिया फोर्ब्ज ने माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल फोर्ब्ज परिवाराचे धन्यवाद. विद्यार्थी दशेत असतांना वैद्यकीय क्षेत्र निवडताना रुग्णसेवा हा माझा माझ्या जीवनाचा ध्यास आहे हे स्वप्न घेऊनच मी शिक्षण पूर्ण केले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय व कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा माझा दृढ संकल्प आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाची उपचारपद्धती माझ्या ग्रामीण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा माझा संकल्प आहे.