नगरदेवळ्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
नगरदेवळा ता.पाचोरा येथे आमदार निधी व जिल्हा परिषद अंतर्गत साडेतीन कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण तालुक्याचे आमदार किशोरआप्पा पाटील व मा. जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
नगरदेवळा गावात आमदारनिधी व जिल्हापरिषद निधी अंतर्गत प्रभाग क्र १ मध्ये उर्दुशाळा बांधकाम करणे २४ लक्ष, पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लक्ष, प्रभाग क्र ३मध्ये मुस्लिम बांधवांसाठी शादिहॉल बांधणे २५ लक्ष, कॉक्रीटीकरण करणे १५लक्ष, मारोती मंदिर दुरुस्थी करणे ३लक्ष, वार्ड क्र ४ महिला शौचालय परिसर पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लक्ष, माळी मंगल कार्यालयात पेव्हर ब्लॉक बसविणे १५लक्ष, वार्ड क्र ६ व्यायाम शाळा बांधकाम करणे १५लक्ष, बालाजी मंदिर बांधकाम २० लक्ष, पशुवैद्यकीय दवाखाना बांधकाम व वालकंपाउंड करणे ७५ लक्ष, संगमेश्वर बंधारा बांधणे १.४०लक्ष, हिम्मतसिंग बाबा रस्ता डांबरीकरण करणे ३०लक्ष अश्या तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या विकास कामांचे आज भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. तत्पूर्वी नागरिकांना संबोधित करतांना आमदार म्हणाले की नगरदेवळा गावावर विषेश प्रेम असून या मंजूर कामांसह आपल्या गावातील उर्वरित विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. तसेच आपलं महाविकास आघाडीच सरकार आहे त्यामुळं गावातील मूलभूत सुविधा व इतर कामे प्रलंबित नराहू देता लवकरच मार्गी लावेल. कार्यक्रमात गावातील मुस्लिम तरुणांनी किशोर अप्पांच्या विकासकामांवर प्रभावित होऊन शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश केला आमदारांनी त्यांचं पक्षाचा रुमाल टाकून स्वागत केलं. त्याप्रसंगी विधानसभा क्षेत्राप्रमुख अविनाश कुडे, शिवणारायन जाधव, सुधाकर महाजन, अब्दुल गणी शेठ, कृष्णा सोनार, प्रकाश परदेशी, सुनील महाजन, राजेश जाधव, सागर पाटील, रवी पाटील, नूर बेग, वसीम शेख, धनराज चौधरी, भास्कर पाटील, अरविंद परदेशी, प्रदीप परदेशी, वसंत जिभु, भारत पाटील, जितेंद्र राजपूत, राहुल राजपूत, धर्मेंद्र पाटील, सुरेश शेळके, गणेश महाले, भाऊसाहेब पाटील, विजय चौधरी, विनोद परदेशी, भैया महाजन, अशोक चौधरी, मनोज राऊळ, रोशन जाधव, नारायण पाटील, गोरख महाजन, कडू पाटील, सोनू परदेशी, अन्वर शेख, गणेश देशमुख, अफझल खान, हबीब शेठ, रउफ शेख, सागर जाधव, रईस कुरेशी, विकी जाधव, सादिक बागवान, अन्सार बेग, दगडू राऊळ, पंडित नाना पाटील, कादर बागवान, राजेंद्र पाटील, पियुष राजपूत, गोटू राऊळ, अनिल तावडे, शेर खान, अनिल पाटील, भागवत पाटील, विनोद पाटील, विजय पाटील यांसह शिवसैनिक, नागरिक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.