स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासन लॉईडस मेटल विषयाबाबत कुंभकर्ण झोपेत…. आम आदमी पार्टीचा आरोप…
आम आदमी पार्टी द्वारा 07 जून 2022 पासुन अन्नत्याग साखळी उपोषण सुरू असून साखळी उपोषणाला 05 दिवस लोटून गेलेले असून सुद्धा लॉईड्स मेटल & एनर्जी लिमिटेड कंपनी द्वारा व शासन प्रशासन, जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार व खासदार यांचे याविषयाला गांभीर्य पूर्वक न घेता यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नसल्यामुळे आज दिनांक 11/06/2022 रोजी आम आदमी पार्टीने लॉईड्स मेटल & एनर्जी लिमिटेड कंपनीच्या गेट समोर धडक दिली व तिथे कोणीही नसल्याचे सांगून कंपनी द्वारा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला व टवळाटवळी उत्तर देण्यात आले. हे सर्व बघता आम आदमी पार्टी जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे यांनी लॉईड्स मेटल & एनर्जी लिमिटेड कंपनी ला चेतावणी देत तीन दिवसांचा अवधी दिला व यावर येत्या मंगळवार पर्यंत तोडगा काढण्यात आला नाही तर कंपनी निषेधार्थ मोर्चा काढत कंपनीला ताला ठोकू अशी चेतावणी जिल्हाध्यक्षानी दिली.
सोबतच सुरजागड मधून येणारा लोहखनिज गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातून येणारे ट्रक ओव्हरलोड वाहतूक होत आहे व सर्व नियम धाब्यावर बसवून वाहतूक होत आहे व त्या गाड्यावर कुठल्याही प्रकारे ताडपत्री चा वापर होताना दिसून येत नाही यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी उप प्रादेशिक अधिकारी यांच्या कडे करण्यात आली.
यावेळी आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, युवा जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार, चंद्रपूर महिला शहर अध्यक्ष ॲड. सुनिता पाटील, घुग्घुस महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार,आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष अमित बोरकर महिला उपाध्यक्ष सोनम शेख, सचिव विपश्यना धणविजय, कोषाध्यक्ष अंजली नगराळे, संघटनमंत्री पुनम वर्मा, सिकंदर सागोरे, सुनील सदभैय्या, जस्मिन शेख, आरती आगलावे, सुजाता बोदेले, रूपा काटकर, मीना पोटफोडे, घुग्घुस शहर उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशीष पाझारे, करण बिऱ्हाडे, जस्मित सिंग, अक्षय ठाकूर, मुकेश पांडे, प्रवीण सोळंके, कविता टिपले इत्यादी उपस्थित होते.