वि.का.सोसायट्यांमध्ये नगरदेवळा-बाळद गटांत शिवसेनेला जोरदार धक्का
नगरदेवळा येथील वि.का.सोसायटी पाठोपाठ आता नेरी ता.पाचोरा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत अमोलभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा प्रणित युवा शक्ती पॅनलने शिवसेनेचा सुपडा साफ करत भाजपाचा सर्वच्या सर्व १३ जागांवर दणदणीत विजय मिळवला असुन नेरी वि.का.सोसा.मध्ये निवडुन आलेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे
सर्वसाधारण मतदारसंघातून
१) पाटील अशोक शिवराम-137
२)पाटील रवींद्र पुंडलिक-133
३)पाटील साहेबराव झावरु-132
४)पाटील अशोक धर्मराज-131
५)सूर्यवंशी विजय रामराव-130
६)पाटील अंकुश यादव-127
७)बोरसे किशोर लालचंद-127
८)पठान बशीरखा दलशेरखा-119
महिला राखीव मतदार संघातून
१)पाटील सिमाबाई विलास-132 २)पाटील निर्मलाबाई मधुकर-129
इतर मागासवर्गीय मतदारसंघातून
१)पाटील ज्ञानेश्वरा विलास-130
अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून
१)अहिरे सोमा दगा-127
विमुक्त जाती/भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून
१)गढरी धर्मा राघो-143
नेरी वि.का.सोसायटीच्या विजयासाठी गावांतील तरुण,जेष्ठ नागरिक,महिला व सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली असून हा विजय संपूर्ण गावाचा विजय आहे.तसेच येणाऱ्या काळांत वि.का.सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कश्या पद्धतीने विविध सेवा सुविधा देत येतील यासाठी आम्ही कटीबद्ध राहू असे निवडुन आलेल्या सर्व नवनिर्वाचित संचालकांनी सांगितले.
तसेच विविध कार्यकारी सोसायटी च्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी नगरदेवळा- बाळत गट ताब्यात घेण्यासाठी एका प्रकारे मोर्चे बांधणी सुरू असुन या गटातील जिल्हा परिषद निवडणुकीत नगरदेवळा,बाळद,नेरी यासारख्या मोठ्या गावांचे मताधिक्य निर्णायक ठरत असते.त्यामुळे भारतीय जनता पार्टीने ही सर्व गावे जी एकेकाळी शिवसेनेचे बालेकिल्ले म्ह्णून ओळखली जात होती.तीच गावे सर करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगल्या प्रमाणात यश ह्या गटांत मिळु शकते अशी चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.