संघपाल भाऊ किर्तीकर यांचा पुणे मधील कॉन्ट्रॅक्टर ला टोला
नेहमी प्रमाणे अनाथांना त्यांच्या ह्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा गाठ संविधान आर्मीशी आहे‼️‼️
पुणे येथील APTIV नावाच्या कंपनी मध्ये NMS कॉन्ट्रॅक्ट मार्फत ज्योती रंगनाथ प्रधान नावाची पूर्ण पणें अनाथ असलेली मुलगी कामाला लागली होती किमान 7 महीने त्या अनाथ मुलीने तिथे काम केले काम करत असताना नेहमी तिच्या पेमेंट मधून 12% नुसार पीएफ कट होत होता पुढे चालून तिच्या काही अडचणी मुळे त्या अनाथ मुलीने काम सोडून दिले व आपल्या पीएफ नंबर ची मागणी तिने कॉन्ट्रॅक्टर ला केली परंतु तुझे आधार कार्ड ब्लॉक आहे त्या मुळे तुला तुझा पीफ नंबर भेटू शकणार नाही मग त्या निराधार मुलीने आधार कार्ड दुरूस्त केले व 2 महिन्यानंतर स्वतःचा पीएफ नंबर ची मागणी तिने केली असता तिला डावला डावली चे उत्तर कॉन्ट्रॅक्टर कडून भेटतं होते सदर अनाथ मुलीचा फोन सुधा उचलत नव्हते आता आपले पैसे असे निघणार नाही असे त्या मुलीला समजता तिने संविधान आर्मीचे भुसावळ तालुका अध्यक्ष संघपाल भाऊ किर्तीकर यांच्या कडे धाव घेतली अर्जा द्वारे आपली तक्रार मांडली संघपाल भाऊ किर्तीकर यांना विषय समजताच त्यांनी तिथल्या कॉन्ट्रॅक्ट ऑफिसला फोन लावला आणि विचारणा केली की तिचे त्या अनाथ मुलीचे आधार कार्ड ब्लॉक होते तर तुम्ही तिचा पीएफ कपात करून कुठे टाकत होते तुम्ही 7 महिने तिची फसवणूक केली आहे तुम्ही तिला पूर्व कल्पना द्यायला पाहिजे होती व आता तिचा 7 महिन्याचा 12% च्या हिशोबाने पूर्ण पीफ 2 दिवसात तिला मिळायला हवा असे निवेदन सुधा देण्यात आले व दि.31/05/2022 रोजी तिला तिचा पीफ हा चेक च्या माध्यमातून भेटला.