स्पर्धा परीक्षा हे साधन तर भारत मातेची सेवा हे साध्य.. प्रा.राजेंद्र चिंचोले
महाराष्ट्र शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत प्रा .राजेंद्र चिंचोले यांचे राज्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय नामदार उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आयोजित करिअर कट्टा या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी सेंट्रल आर्म पोलीस फोर्स / असिस्टंट कमांडंट परीक्षेची तयारी व यासोबत इतर स्पर्धा परीक्षेंची तयारी यावर राज्यातील ५,००० विद्यार्थ्यांना ७ मे २०२२ रोजी ऑनलाइन मार्गदर्शन केले.
प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी भारतातील केंद्रीय निमलष्करी सुरक्षा दलातील सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ,केंद्रीय राखीव पोलीस दल, भारत तिबेट सीमा पोलीस दल ,सशस्त्र सीमा पोलीस दल यातील असिस्टंट कमांडंट या परीक्षेची तयारी कशा प्रकारे करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले .असिस्टंट कमांडंट हे पद अत्यंत महत्त्वाचे ,मानाचे ,प्रतिष्ठेचे आहे .केंद्रीय लोकसेवा आयोगाची सी ए पी एफ ही परीक्षा देऊन राष्ट्राची सेवा करणे हे साध्य आहे. या परीक्षेची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता ,परीक्षेचे स्वरूप, परीक्षेचा अभ्यासक्रम ,त्यासाठी अभ्यासावयाची पुस्तके ,मुलाखत याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना सातत्याने कष्ट करण्याची तयारी हवी. स्पर्धा परीक्षा हे साधन असून अधिकारी बनून देशाची सेवा करणे हे साध्य आहे .स्पर्धा परीक्षेत परिश्रम, शिस्तबद्ध, सूत्रबद्ध ,नियोजन पूर्व अभ्यास करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकले नाही तर दुसऱ्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने करिअर करावे असे प्रतिपादन प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी केले .असिस्टंट कमांडंट या पदाच्या माध्यमातून उत्तम ,रचनात्मक ,सर्वोच्च, दैदिप्यमान ,यशस्वी करावे व राष्ट्राची सेवा करावी अशा प्रकारच्या शुभेच्छा प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा.यशवंत शितोळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रंजना भोसले यांनी केले. कार्यक्रमास करिअर कट्ट्याचे विभागीय समन्वयक, जिल्हा समन्वयक, प्राध्यापक व ५,००० विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते.