श्री सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तीन वर्षे पूर्ण रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा डॉ. स्वप्निल पाटील
पाचोरा शहरातील सर्व बाजूने मध्यवर्ती ठिकाणी पाचोरा भडगाव हायवे कॉलेज चौफुलीजवळ श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल सुरू करून तीन वर्ष पूर्ण झाले असून आजूबाजूच्या सर्व खेड्या वरील रुग्णांना जळगाव जाण्याची आवश्यकता नसून सर्व मशिनरी उपलब्ध असलेले श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल यांना आज तीन वर्षे पूर्ण झाले असून श्री स्वप्निल दादा पाटील व सौ ग्रीष्मा ताई पाटील पेशंटच्या सेवेत अहोरात्र मेहनत करून सेवा देत आहे.
आजारपणाची सर्वांनाच भीती असते आणि त्यातही तो आजार रुग्णाला क्रिटिकल केअर विभाग म्हणजे आय सी यु पर्यंत नेणारा असेल तर त्यामध्ये असलेला धोका व आजाराचे गांभीर्य हे अधिकच असते. अशावेळेस रुग्णाचा क्षण आणि क्षण महत्त्वाचा असतो आणि योग्य ते उपचार न भेटल्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता अशा आजारांमध्ये खूप जास्त असते. पाचोरा शहरात असलेले सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे अशा अति गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरलेले आहे.
एम बी बी एस आणि एम डी मेडिसिन मध्ये गोल्ड मेडलिस्ट असलेले सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर स्वप्निल प्रल्हादराव पाटील यांनी त्यांचे शालेय शिक्षण गो से हायस्कूल पाचोरा आणि महाविद्यालयीन शिक्षण एम एम कॉलेज पाचोरा येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी त्यांचे एम बी बी एस मुंबई येथील लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज व सायन हॉस्पिटल येथून पूर्ण केले. एम डी मेडिसिन मध्ये ते गोल्ड मेडलिस्ट होते. अजमेर मेडिक्वीझ मध्ये फर्स्ट प्राइझ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया च्या एप्रिल आणि जून 2017 त्या चाप्टर मध्ये त्यांचे पेपर पब्लिकेशन झालेले आहे, इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेडिकल सायन्स अँड एज्युकेशन 2017 मध्ये सुद्धा त्यांचे पेपर पब्लिकेशन झालेले आहे. जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे आई सी यु विभागात सेवा देऊन आपल्या अनुभवात त्यांनी अधिकच भर घातली… त्यानंतर पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल मधून कार्डिओलॉजी व टू डी इको ची फेलोशिप त्यांनी पूर्ण केली. रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन युके तर्फे डायबिटीस अंड रिनल मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा ही पदवी देऊन त्यांना गौरवण्यात आले.
पाचोरा येथे गो से हायस्कूल मध्ये शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे कार्य करणारी आई, सौ प्रमिला पाटील व वकिली व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवा करणारे वडील श्री. प्रल्हादराव पाटील यांच्याकडून त्यांना समाजसेवेचा वारसा हा भेटलेलाच होता. ज्या मातीत आपण वाढलो त्याचे आपल्याला काही ऋण लागतात ह्या उद्देशाने त्यांनी पाचोरा येथे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेले 60 बेडस चे सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा 5 मे 2019 रोजी शुभारंभ केला. “मातीतल्या माणसांची मनोभावे सेवा व निरामय आरोग्यासाठी आयुष्यभर समर्पण” हे ब्रीद असलेल्या आणि सामाजिक बांधिलकी, सेवाभावाने, माफक दरात, सर्वोत्तम तत्पर रुग्णसेवा देणारे सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा आणि भडगाव परिसरात अल्पावधीत लोकप्रिय ठरले. या हॉस्पिटलमध्ये सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा, 14 बेड चे आय सी यु, पाच बेड चे एन आय सी यु, एक्स-रे युनिट, सिटीस्कॅन, टू डी इको स्ट्रेस टेस्ट, सुसज्ज अशी रुग्णवाहिका आधी अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत.
कोरोना महामारीमध्ये कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करताना स्वतः कोरोना बाधित झाल्यानंतर अल्पकाळ उपचार घेऊन पुन्हा रुग्णसेवेसाठी सज्ज झालेले डॉक्टर स्वप्निल पाटील हे पाचोरा-भडगाव परिसरातील नागरिकांसाठी देवदूतच ठरले होते. त्यांच्या आशीर्वाद कोविड सेंटर आणि सिद्धिविनायक कोविड सेंटर च्या माध्यमातून रोज शंभरच्यावर ऍडमिट असलेल्या पेशंटची हॉस्पिटलमध्ये थांबूनच त्यांनी अहोरात्र अशी रुग्णसेवा दिली.
वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल 1 जुलै 2020 साली दिव्य-मराठी वृत्तपत्र परिवार तर्फे “हेल्थ अवॉर्ड 2020” देऊन त्यांना गौरवण्यात आले. कोरोना महामारीत केलेल्या अहोरात्र रुग्णसेवे बद्दल 10 जुलै 2021साली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री मा श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते “कोरोना योद्धा” म्हणून त्यांना गौरवण्यात आले.
आरोग्यविषयक जनजागृती साठी, तसेच सामाजिक बांधिलकी च्या दृष्टीने पाचोरा व भडगाव परिसरात शहरी व ग्रामीण भागात सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. तसेच वेगवेगळे वृत्तपत्र जनशक्ती, लोकमत, सकाळ, दिव्य मराठी आदींच्या माध्यमातून लोकांना आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने त्यांचे आरोग्य विषयक लेख नेहमी प्रकाशित होत असतात.
डॉक्टर स्वप्निल प्रल्हादराव पाटील यांच्या सेवा आणि समर्पणातल्या ह्या प्रवासात तितकीच खंबीर साथ त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर सौ ग्रिष्मा पाटील यांच्याकडून भेटते. डॉक्टर ग्रिष्मा पाटील ह्या बालरोग व नवजात शिशुरोग तज्ञ आहेत.
अहोरात्र रुग्णसेवा करून पाचोरा भडगाव परिसरातील शेकडो रुग्णांचे प्राण वाचणारे डॉक्टर स्वप्निल प्रल्हादराव पाटील आणि डॉक्टर ग्रिष्मा पाटील यांच्या सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ची रूग्णसेवा, विश्वास, लौकिक असाच गगनाला गवसणी घालो आणि रुग्णांना जीवनसिद्धी देण्यास अग्रणी आणि यशस्वी ठरो हीच आमची शुभकामना.