महिला दिनानिमित्त बहिणाबाई चौधरी यांना समर्पित शब्दशिल्प कलाविष्कार संघ यांच्या कडून विशेष प्राविण्य प्राप्त कविता स्वरचित कविता सौ निता प्रवीण शेंडे

महिला दिनानिमित्त बहिणाबाई चौधरी यांना समर्पित
शब्दशिल्प कलाविष्कार संघ यांच्या कडून विशेष प्राविण्य प्राप्त कविता

शीर्षक. खानदेशची आई

खानदेशची आई
बहिणाबाई अशी
गाऊ नवलाई
शब्दात कशी

खुप सोसला
ऊन – साऊलीचा खेळ
तरी बसविला
संसाराचा मेळ

किती झिजली
संसारासाठी
जरी हरवली
हातातून काठी

आनंद जीवनात
पाहिलाच नाही
शेतात रबतांना
झाली तनाची लाही

निरक्षर काव्य
शब्दात मांडल
कष्ट करतांना
ओठांवरून सांडल

” बहिणाबाईंची गाणी ”
बनला काव्यसंग्रह
सुक्ष्म निरिक्षणांनी
चमकला एक ग्रह.

स्वरचित कविता
सौ निता प्रवीण शेंडे, पाचोरा , जि. जळगाव.