पाचोरा येथील तलाठी कार्यालय उदघाटनाच्या प्रतीक्षेत
पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा येथील कोंडवाडा गल्ली जवळील (चावडी म्हणून ओळख असलेले) तलाठी कार्यालय कार्यरत होते त्या ठिकाणी पाचोरा शहरातील नागरिकांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मध्यवर्ती असं तलाठी कार्यालय असून कागदपत्र काढण्यासाठी शेतीचा सातबारा उतारा विद्यार्थ्यांसाठी शालेय उत्पन्नाचे दाखले त्याठिकाणी सहज उपलब्ध होते सकाळी आठ ते बारा व दुपारी दोन ते सहा पर्यंत कार्यालय चालू राहत होते त्यामुळे नागरिकांचे व्यवस्थित काम होत होते पण ती जुन झालेले तलाठी कार्यालय मोडकळीस आले होते त्यामुळे तिथे काम करणारे अधिकारी सुद्धा बसायला घाबरत होते केव्हा पडेल याची भीती निर्माण झाली होती त्याची तात्काळ दाखल पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री किशोर आप्पा पाटील यांनी स्वतः लक्ष घालून त्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्यासाठी आमदार निधीतून तात्काळ पैसे मंजूर करून बांधकामास सुरुवात केली विद्यार्थ्यांचे व शेतकऱ्यांचे हाल होऊ नये म्हणून तात्पुरती तलाठी ऑफिस कार्यालय पाचोरा पोलीस स्टेशनच्या मागे एका खोलीत व्यवस्था केली होती पण ते कार्यालय छोटे पडत होते त्यामुळे नागरिकांचे विद्यार्थ्यांचे हाल होत होते त्यामुळे जुने तलाठी कार्यालय खोली पाडून तात्काळ कामाला सुरुवात केली आता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना व येणाऱ्या वयोवृद्ध शेतकऱ्यांना बसण्यासाठी मध्ये व बाहेर व्यवस्था करण्यात येणार असून लवकरच त्या तलाठी कार्यालय खोलीचे उद्घाटन होणार असून माननीय श्री पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांचे पीए श्री राजेश पाटील स्वतः लक्ष घालून काम करून घेत आहे व होणाऱ्या विद्यार्थ्यांच शेतकऱ्यांचे हाल थांबतील यासाठी तलाठी कार्यालय पुन्हा नवीन दालनात उभारण्यात आल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे त्या दालनाचे लवकरच उदघाटन होऊन लोकांच्या सेवेसाठी लवकरच अर्पण करण्यात येईल.