विधवा वहिनीशी लग्न करून दिराने दिला आधार नानखुर्द गावातील वाघ परिवारातील आदर्श
मुलगी मयुरी,मुलगा साई, चिमुकल्या बाळाना पित्याचे छत्र समाधान वाघ यांचा दोन वर्षापूर्वी अपघाती निधनानंतर बारकु वाघ दिराने विधवा वहिनीशी लग्न करून तिला आधार देऊन समाजापुढे व इतरांपुढे आर्दश उभा केला आहे बारकू वाघ असे या तरुणाचे नाव आहे राहणार.. नानखुर्द कासोदा येथील सामान्य कुंटुबातील वडील राजेंद्र वाघ यांचा मोठा मुलगा समाधान राजेंद्र वाघ यांच्याशी पुनम हिचा विवाह 2016मध्ये नानखुर्द येथील समाधान वाघ याच्याशी विवाह झाला.मागील 2वर्षापूर्वी 2019रोजी समाधान वाघ याचे नानखुर्द येथे अपघाती निधन झाले कुटुबाची जबाबदारी वडील राजेंद्र वाघ यांच्या वर आली घरातील कर्ता मुलगा गेल्याने विधवा सुनेसह मुलगी मयुरी(वय 6 ) मुलगा साई (वय 4 )यांच्या भविष्याचे काय या चिंतेत घरातील वडीलधारी मंडळी यांनी पाचोरा येथील मुलीचे चुलत काका शांताराम शेलार आणि मुलाकडील मंडळी यांच्याशी बातचीत करुन लहान अविवाहित मुलगा बारकु वाघ(आकाश)यांच्याशी करावा याबाबत चर्चा केली असता त्यास (सुन)पुनम व मुलगा बारकु यांना समजून बातचीत केली असता याचा होकार मिळाला.सुनेच्या माहेरी पाचोरा येथील शुक्रवारी दिनाक 26 मार्च 2022रोजी दुपारी 12 वाजता वैदिक पध्दतीने श्री. खंडेराव महाराज (काकानबर्डी) येथे साध्या पद्धतीने सोहळा संपन्न झाला. पाचोरा येथील वडीलधारी मंडळी आई, दोनभाऊ, काका शांताराम शेलार, भरत शेलार, प्रकाश शेलार, जगदीश शेलार, सुभाष शेलार, एकनाथ शेलार, रमेश शेलार, प्रविण वाघ, सचिन शेलार, बाबुलाल शेलार, गोपाल वाघ,आदी समस्त शेलार परीवार उपस्थित होते. आणि मुलाकडील चि. बारकु &सौ.पुनम हिला शुभ आशीर्वाद दिले. मयुरी 6 वर्षाची साई 4वर्षाचा यांना स्विकार करत सर्वांच्या साक्षीने पुनमला जीवनसाथी म्हणुन स्वीकारले.