नांद्रा येथे पुन्हा पुष्पाच्या औलादिंचा चंदनाच्या झाडांवर डल्ला

नांद्रा येथे पुन्हा पुष्पाच्या औलादिंचा चंदनाच्या झाडांवर डल्ला

नांद्रा ता. पाचोरा (वार्ताहर )
येथे काही महिन्यापूर्वीच गोकुळ बाविस्कर,राजमल बाविस्कर, संजय बाविस्कर,विनोद बाविस्कर यांच्या बांधावर असलेल्या चंदनाच्या 10 ते 12 झाडांचे खोड कापूण नेल्याची घटना ताजी असतानाच व यापूर्वीही त्याच परिसरात स्वामी विष्णू दाजी महाराज यांच्या श्रीराम आश्रमात आत मध्ये घुसून चंदनाचे झाडे कापून नेण्याचा प्रकार घडला असताना आज सकाळी पुन्हा त्याच शिवारातील अशोक गोकुळ पाटील गट नंबर 25 यांच्या शेतात सुमारे बारा वर्ष नसलेल्या चंदनाच्या झाडांचे बुंधे कापून नेल्याची घटना समोर आलेले आहे. यामुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याचे विस्तारित वृत्त असे की नांद्रा ही संतांची भूमी असून या ठिकाणी कल्याण जी महाराज यांचा आश्रम आहे तेथेही मोठ्या प्रमाणात फळ फुलं इतर झाडे आहेत याबरोबरच स्वामी विष्णू दाजी महाराज यांचाही याठिकाणी श्रीराम आश्रम आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराजांनी वेगवेगळी औषधी वनस्पती झाडे फळे,फुले, यांची झाडां बरोबरच चंदनाची झाडे सुमारे वीस वर्षांपूर्वी लावलेले आहेत त्यामुळे या आश्रमातील झाडांमुळे या झाडांचे फळ पक्षी खाऊन ते परिसरात शेतात इतर झाडांवर बसून त्यांची विस्टा पडल्यामुळे व वारा वादळ मुळे बियाणे परिसरात पडल्यामुळे ही नांद्रा परिसरात असे अनेक चंदनाचे झाड बेवारस,कुठे शेतात, कुठे बांधावर उगवल्याने शेतकऱ्यांनी त्यांचे बऱ्याच वर्षापासून पाणी देऊन जतन केलेले आहे परंतु त्याचे महत्त्व व किंमत शेतकऱ्यांना नसल्याने ते माळरानावर तसेच हळूहळू नैसर्गिक मोठे होत असतात परंतु या विरप्पनच्या पिलावळ व पुष्पाच्या अवलादी चंदन तस्कर यावर लक्ष ठेवून असतात व यामध्ये योग्य वेळी चंदनाचा सुवास व विशिष्ट खोड परिपक्व झाल्यावर ते त्यावर रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन डल्ला मारतात तरी अशा चंदन चोरांचा कायम बंदोबस्त होण्याची मागणी त्रस्त शेतकरी वर्ग वृक्षप्रेमी यांनी केलेली असून रात्रीची गस्त शेतकरी वर्ग आता सुरू करणार असून ठीक ठिकाणी शेतात रात्रीचा ठिय्या व राहुटी उभारून शेतकरी वर्ग खडा पहारा ही देण्याचे शेतकरीवर्ग मधून बोलले जात आहे