कुरंगी बांबरुड गटात विविध साठवण बंधाऱ्यांचे भूमिपूजन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न
नांद्रा ता. पाचोरा (वार्ताहर) कुरंगी बांबरुड गटात विविध प्रकारचे साठवण बंधारा यांचे भूमिपूजन सोहळा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले पाचोरा तालुक्यात वडगाव टेक, दुसखेडा, पाचोरा या ठिकाणी हिवरा नदीवर सुमारे 3 कोटी 63 लाख रुपयाचे साठवण बंधारे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या व जि. प सदस्य पदमबापू पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर होऊन उभारण्यात येणार आहे त्यामुळे परिसरात हरितक्रांती होणार आहे यामध्ये पाचोरा साठवण बंधारा सुमारे 95 लाख, दुसखेडा येथे साठवण बंधारा सुमारे 1 कोटी 7 लाख, वडगाव टेक 1 साठवण बंधारा सुमारे 79 लाख,वडगाव टेक 2 साठवण बंधारा सुमारे 80 लाख, अशा एकूण 3 कोटी 63 लाख रुपयाच्या साठवण बंधारा यांचं भूमिपूजन कार्यक्रम पाचोरा भडगाव आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंह पाटील यांनी किशोर आप्पा पाटील यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन जाहीर सत्कार केला या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात कुरंगी बांबरुड गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले की संपूर्ण पाचोरा तालुका जास्तीत जास्त पाण्याखाली आणून शेती सिंचनासाठी आगामी काळात कशाप्रकारे नियोजन करता येईल याबरोबरच सौर पंप व विजेचे ही योग्य नियोजन महत्वाचे असल्याचे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय जी गोहील,माजी सभापती डॉक्टर भरत बापू,माजी नगराध्यक्ष बंडू चौधरी, शिवसेना तालुकाप्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोरजी बारावकर,मार्केट संचालक शिवदास तात्या पाटील, माजी सभापती पंढरी अण्णा पाटील, जारगाव सरपंच सुनील पाटील, शेवाळे सरपंच, डॉ. शेखर पाटील,माजी सरपंच वाडी, संदीप पाटील खेडगाव,भगवान पाटील सरपंच वेरुळी,बाळू तात्या माजी सरपंच वेरुळी, शशी महाजन माजी सरपंच दूसखेडा,मनोज पाटील सरपंच दूसखेडा, सचिन पाटील सरपंच परधाडे, भगवान पाटील सरपंच वडगाव टेक,भुषण पाटील माजी सरपंच वडगाव टेक, उपतालुकाप्रमुख विनोद आप्पा बाविस्कर नांद्रा,शरद तावडे उपतालुकाप्रमुख युवराज काळे बांबरुड, पत्रकार गणेश शिंदे,पत्रकार प्रा. यशवंत पवार, इंजिनीयर निकम साहेब व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशवंत पवार यांनी तर आभार प्रदर्शन जि प सदस्य पदमसिंह पाटील यांनी केले कार्यक्रमाचं आयोजन वसंत पाटील पोस्टमन यांच्या शेतात करण्यात आले होते