*रंगश्री चा आकाश फाईन आर्ट सी. ई. टी. मध्ये तिसरा*
*पाचोरा, प्रतिनिधी* !
महाराष्ट्र शासनाची फाईन आर्ट सी. ई. टी. परीक्षा २०२० मध्ये झाली होती. या परीक्षेतून होणाऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट च्या जे. जे स्कुल ऑफ आर्ट, मुंबई, तसेच औरंगाबाद, नागपूर कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. या फाईन आर्ट मध्ये पाचोऱ्यातील रंगश्री आर्ट फाऊंडेशन या ड्रॉईंग क्लासेस चा विद्यार्थी आकाश छगन सावंत हा महाराष्ट्रातून ३ रा आलेला आहे. आकाश ला सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, मुंबई येथे प्रवेश मिळाला आहे. त्याचे जलरंगातील निसर्ग चित्रेही खूप सुंदर आहेत.
सोबतच रंगश्री ची विद्यार्थीनी अक्षदा मनोज पाटील हिला सुद्धा सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, मुंबई येथे प्रवेश मिळाला. अजय पांडुरंग विसपुते ह्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट, औरंगाबाद येथे प्रवेश मिळाला आहे. पाचोरा परिसरातील विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर व्यावसायिक, डॉक्टर, गृहिणी यांच्या मध्ये ७ ते ८ वर्षांपासून रंगश्री कलेची गोडी निर्माण करत आहे. रंगश्री तुन फाईन आर्ट, आर्किटेक्ट या क्षेत्रातील एन. ए. टी. ए., डिझाइन क्षेत्रातील एन. आय. डी., यु. आय. डी., यु. सी. ई. ई. डी., फॅशन क्षेत्रात एन. आय. एफ. टी. याविविध सी.ई.टी. ची पूर्व तयारी केली जाते. रंगश्री चे संस्थापक स्व. एम .सी. सोनार यांनी स्थापित केलेल्या रंगश्रीच्या अध्यक्षा श्रीमती मंजुळा मुरलीधर सोनार, व सुबोध कांतायन यांच्या हस्ते या तीनही कलाकारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भारती कांतायन, अजय पाटील, वैभव शिंपी यांनी व परिसरातील नागरिकांतर्फे त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.