खरिप हंगाम सन २०२२ करिता आवश्यक असलेले
कापूस व सूर्यफुलाचे बियाणे वेळेवर व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्या खासदार उन्मेशदादा पाटील यांचे मागणी
———————————-
*यावर्षी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने तसेच मागील वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने पूर्वहंगामी लागवड वाढणार असल्याने त्यादृष्टीने नियोजन करण्याची केली मागणी*.
—————————————
गेल्या वर्षी सुर्यफुलाचे बियाणे जास्त दराने शेतकऱ्यांना खरेदी केले आहेत. ही समस्या पाहता त्यादृष्टीने नियोजन करून बियाणे उपलब्ध करून देण्याची केली मागणी.
—————————–
जळगाव – खरीप हंगाम (सन २०२२) जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले पिकापैकी कापूस व सूर्यफूल या पिकाच्या बियाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता या वर्षी निर्माण झाली असून विविध भागातील शेतकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार मागील खरीप हंगामात (सन २०२१) मध्ये चांगले पर्जन्यमान झाल्याने संपूर्ण जिल्हाभरात मुबलक पाण्याचा साठा असल्याने व मागील वर्षी कापसाला मिळालेल्या भावानुसार या वर्षी कापूस लागवडी खालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. असल्याने येत्या खरिप हंगाम सन २०२२ करिता आवश्यक असलेले
*कापूस व सूर्यफुलाचे बियाणे वेळेवर व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्या* अशी आग्रही मागणी
*खासदार उन्मेशदादा पाटील* यांनी राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की मागील खरिप (सन २०२१) चा पिक पेरणी अहवालाची पडताळणी केली असता कापूस पिकाखालील क्षेत्र ५३६४८९ हे.(कोरडवाहू – ३०३७५३ हे. व बागायती – २३२७३६ हे.) एवढे होते. यावर्षी सदरचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच *बहुतांशी शेतकरी मोठ्या प्रमाणात पूर्व हंगामी लागवड करण्याची शक्यता निर्माण झाली आहे*.
त्याचप्रमाणे जिल्ह्यात सूर्यफूल या पिकाखालील क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात वाढत असून मागील वर्षाचा पेरणी अहवाल पाहिले असतात अंदाजित १००० हे. (९०० हे.- लेट खरिप व १०० हे. – रब्बी) लागवड झालेली होती. परंतु शेतकरी बांधवांकडून असे निदर्शनास आले आहे की सूर्यफुलाच्या बियाणे बाबत जिल्ह्यात कुठलेही नियोजन न झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जास्त दराने बियाणे खरेदी करावे लागले आहे. ही गेल्या वर्षीची समस्या पाहता आपण तात्काळ कृषि विभागास सूचना देऊन या वर्षी पूर्वहंगामी कापूस पिकाच्या लागवडीच्यादृष्टीने आवश्यक असलेले बियाणे तसेच सूर्यफूल या पिकाचे वाढत असलेले क्षेत्र व त्याकरिता आवश्यक असलेल्या बियाण्याची मागणी व पुरवठा वेळेवर व मुबलक प्रमाणात होईल. यादृष्टीने तात्काळ याबाबत संबंधित विभागास आदेश देऊन मला अवगत कराल. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी मा.जिल्हाधिकारी यांचेकडे दिलेल्या निवेदनात केली आहे. या आशयाच्या प्रती पुढील कार्यवाहीसाठी
मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव, मा. कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांना देण्यात आल्या आहेत.