परीक्रमा ही मतांसाठी नव्हे तर गिरणेच्या संवर्धनार्थ लोकांचे मने जोडण्यासाठी खा.उन्मेष पाटील

परीक्रमा ही मतांसाठी नव्हे तर गिरणेच्या संवर्धनार्थ लोकांचे मने जोडण्यासाठी

गिरणा परिक्रमेने ओलांडला गिरणेचा एक काठ !

गुढे ता भडगाव येथून दुसऱ्या काठावरून प्रवासाला सुरुवात भडगाव तालुक्यातील गिरणा खोऱ्यात परिक्रमेचे जागोजागी उत्स्फूर्त स्वागत.

गिरणेची परीक्रमा ही मतांसाठी नव्हे तर गिरणा काठावरील लोकांचे मने गिरणेच्या संवर्धनार्थ जोडण्यासाठी आहे. असे मत व्यक्त करत गिरणा नदिवरील रखडलेले बलून बंधाऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्यक्ष भेटून विनंती केली आहे. गिरणा परीक्रमेच्या दहाव्या टप्प्याला भडगाव तालुक्यातील गुढे येथुन सुरवात झाली तर सावदे, कोळगाव, पिंप्रीहाट, बात्सर, पिचर्डे मार्गे सायंकाळी 10 वाजता पांढरद येथे समारोप करण्यात आला. यावेळी पाचोरा तालुकाध्यक्ष युवा नेते अमोल शिंदे, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. वेळोवेळी प्रास्ताविकातून मान्यवरांनी भुमिका मांडली. आपली गिरणा नदी सध्या आययुसीत आहे. ती अजुन मृतवस्थेत गेलेले नाही त्यामुळे वेळीच जलप्रदूषण, वाळू उपसा थांबविणे आवश्यक असल्याचे सांगून पुढच्या पिढीसाठी गिरणा पुनरूज्जीवन अभियान असून आपण सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन केले.

परिक्रमा ठरतेय लोक चळवळ

गिरणा नदी परिक्रमेत दिवसेंदिवस गिरणाप्रेमींचा सहभाग वाढत असल्याने परिक्रमा ठरतेय लोक चळवळ प्रचंड वाळूची संपत्ती आहे. मात्र अवैध वाळू उपसाने गिरणेचे वस्रहरण होत आहे. त्यामुळे शासनाने वाळूला पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने वाळूच्या बाबतीत धोरण बदलविणे गरजेचे आहे. तर बहूतांश शहरातील सांडपाणी हे गिरणेत सोडले जाते. त्यामुळे गिरणेचे होणारे जलप्रदूषण ही थांबविण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. यासाठी चळवळ उभी करण्याचा माझा संकल्प आहे. यासाठी सातार्याचे पाणी फाऊंडेशन चे अविनाश पोळ, बांबु मॅन पाशा पटेल यांची मदत घेण्याचे नियोजन आहे. माझी सर्वांनी विनंती आहे ह्याकडे राजकीय हेतून न पाहता एकत्रित येऊन सहभाग घ्यावयाचा आहे.