जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वार्निंग वाक करणाऱ्या महिलांचा सामाजिक कार्यकर्त्या शिक्षिका सौ सुवर्णा पाटील यांनी आगळावेगळा पद्धतीने साजरा करून महिलांचा उत्साह वाढविला
पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या व रांगोळीच्या माध्यमातून विविध विषयावर रांगोळी रेखाटणाऱ्या व रांगोळी साठी प्रसिद्ध असणाऱ्या शिक्षिका सौ सुवर्णा पाटील या अनेक विविध कार्यक्रम घेत असून त्यात सामाजिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरता असो किंवा विद्यार्थिनी करता नेहमी मोलाची मदत असते महिलांकरता अनेक सामाजिक उपक्रम राबवून जनजागृती निर्माण करतात रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक श्री छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सौ सावित्रीबाई फुले तसेच मतदारांची जनजागृती यावर हुबेहूब रांगोळ्या तयार करतात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून पाचोरा शहरातील विविध कार्यक्रमात उत्कृष्टपणे सूत्रसंचालन करून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. एक महिला असून प्रत्येक क्षेत्रात त्यांना काम करण्याची आवड आहे, त्यांनी पाचोरा शहरात आपला आगाव वेगळा ठसा निर्माण केला आहे.त्यांचा ग्रुप जवळ जवळ एक वर्षांपासून मॉर्निग वॉक करत आहे,दररोज सर्व महिला सकाळी 5 ते 6 या वेळेत वॉकिंग व रनींग करतात,रविवारी झुंबा,एरोबिक असे स्वतः सुवर्णा मॅडम शिकवतात, आज महिला दिवस असून त्यांनी वेगळा कार्यक्रम करण्याचा संकल्प करून आज सकाळी पाच वाजता त्यांनी मॉर्निंग वाकला येणाऱ्या महिलांचा गुलाब पुष्प व पेढा देऊन सत्कार केला व आपले रोजचे वरकाउट केले .विशेष म्हणजे या सर्व महिल. सौ सुवर्णा पाटील
डॉ.संगीता पाटील
सौ.सीमा देवरे
सौ.लक्ष्मी पाटील
सौ.प्रतिभा बडगुजर
सौ.ज्योत्स्ना चित्ते
सौ.विजया पाटील
सौ.ज्योती देशमुख
सौ.मधुरा पाठक
कु.प्राजक्ता भावसार
श्रीमती मीना पवार
सौ.राजश्री पाटील मॅडम
सौ.राजश्री पाटील
सौ.वृंदा सोमवंशी
कु.गुंजन पाटील एकच पिंक कलर च्या साड्या परिधान करून वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण केले सर्व महिलांनी मॉर्निंग वाकला येणाऱ्या सर्व महिलांचा गुलाब पुष्प देऊन व तसेच लहान मुलांना पेढे व चॉकलेट देऊन जोरदार स्वागत केले या उत्सवाच्या वेळी लहानशी चिमुकली गुंजन हिने सुंदर स्पीच दिले कविता सादर केली व सर्वांना अचंबित केले व काही महिलांनी महिला दिनावर आधारित गाणी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली या सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.हा सर्व कार्यक्रम शिवतीर्थ मैदानावर साजरा करण्यात आला💐💐💐