केसरी ट्रॅव्हल्स टूर्स ने यात्रे करण कडून रक्कम घेऊन यात्रेस घेऊन जाण्यास केली टाळाटाळ तक्रारदाराच्या तक्रारी ने ग्राहक न्यायालयाच्या निकालाने यात्रेकरू यास संपूर्ण रक्कम व्याजासह देण्याचे केले आदेश
भारतातील नागरिकांचा आपल्या संपूर्ण कुटुंबाला प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी घेऊन जावे यासाठी प्रायव्हेट टूर्स ने जावे याकरिता नियोजन करतात एखाद्या विश्वासातला व ओळखीचा टूर्स वाला यांच्याशी संपर्क साधतात कारण टूर्स मध्ये अनेक प्रवासी असतात सर्वजण त्या टूर्स मालकावर भरोसा ठेवतात व यात्रेकरू त्याला सर्व रक्कम देऊन बुकिंग करीत असतात ते आपल्याला तारीख देतात त्यावेळेस आपण जाण्यासाठी सर्व तयारी करतो पण ऐन वेळेस टूर्स वाल्याने आपल्याला नकार दिला तर आपण त्याला विनंती करत असतो कधी निघणार आहे कधी जाणार आहे कारण आपल्या परिवारासोबत आपल्याला जायचं असतं तो वेगळा आनंद असतो टूर्स वाला प्रवास करण्यास नकार देत असेल तर किंवा टाळाटाळ करत असेल तर आपण आपली रक्कम त्याच्याकडे मागतो तो रक्कमही देत नाही व टूर्सला नेत नाही अशा वेळेस आपली फसवणूक झाली आहे असे आपण समजतो आपण फसलो असे समजून काहीजण रक्कम सोडून देतात पण याला एक डेरिंगबाज महिला सौ शितल संदीप महाजन यांनी त्याला ग्राहक न्यायालयात याचिका दाखल करून आपली संपूर्ण रक्कम व्याजासहित वसुलीचे आदेश दिले.
पाचोरा- येथील रहिवाशी सौ.शितल संदीप महाजन यांनी केसरी टुर्स च्या जळगांव येथील एजंन्ट मार्फेत दिनांक 20/01/2020 रोजी स्वतः सह आपली आई व दोघं मुली अशा चार जणांची 05/05/2020 ते 17/05/2020 या कालावधीकरीता यात्रा जाणेसाठी बुंकीग केली होती.या 12 दिवसा कंरीताच्या यात्रेसाठी चारही जणांची एकुण रक्कम रू. 1,97,400 / – मात्र अक्षरी एक लाख सत्त्यांनउ हजार चारशे मात्र केशरी टुर्सच्या जळगांव येथील एजंन्ट यांचेकडे दिनाक 20/01/2020 रोजी रोख रक्कम देवुन तशी पावती देखील घेतली होती. किंबहुना जाणेसाठी संपुर्ण तयारी देखील करून ठेवली होती मात्र बुकीग केल्यांनतर दोन महीन्यांनी म्हणजेच दिनाक 20/03/2020 पासुन संपूर्ण भारतात कोवीड -19 हया विषाणुच्या संसर्गजन्य आजारामुळे संपुर्ण जगात लॉकडाउन घोषीत करण्यात आले होते व त्यांनुसार केशरी टुर्स यांनी तक्रारदार शितल महाजन हीस सदरहु चारधाम यात्रा स्थगित ठेवल्याबाबत देखील कळविण्यात आलेले होते. संपूर्ण जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तक्रारदार शितल महाजन यांना चारधाम यात्रेस जाता येणे शक्य नव्हते. तक्रारदार महीला हिने बुकींग केल्यांनतर जवळपास 1 ते दीड वर्षे झाल्यांनतर देखील कोरोना महामारीमुळे संपुर्ण निर्बंध असल्याने चारधामा यात्रा जाणे शक्यच नसल्याने तक्रारदार हीने स्वतः व तक्कारदाराचे पती संदीप दा. महाजन यांनी केसरी टुर्स ग्रुपकडे वेळो-वेळी पत्रव्यवहार फोनव्दारे, मेलव्दारे व प्रत्यक्ष भेटुन चारधाम यात्रेची बुकींग रक्कम रू.1,97,400 / – मात्रची रक्कम परत करण्याबाबत विनंती केली.परंतु केशरी टुर्स सदरहु बुकींची रक्कम परत करता येणार नाही असे सांगीतले तक्रारदार यांस आपली बुकींगची रक्कम परत मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचे पती संदीप महाजन यांनी जळगांव येथील विधी तज्ञ अँड. अशोक. जे. महाजन यांच्या Mo. 8380083283/9850902112 यावर संपर्क साधुन त्यांच्या 8 जे.टी. चेंबर कार्यालयात सदर प्रकरणी भेटी वेळ घेतली आणि अँड. महाजन यांच्याशी केलेल्या चर्चाअंती
जळगांव येथील ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाद मागितली असता मे. आयोगाने सदरहु तक्रारदार सौ. शितल संदीप महाजन यांचा तक्रार अर्ज खर्चासह मंजुर केरून मे. ग्राहक न्यायालयाने सौ. शितल महाजन यांच्या बाजूने दि.28 फेब्रू.2022 रोजी दिलेल्या निकालात स्पष्ट केले आहे की दि.केशरी टुर्स व जळगांव येथील कार्यालय यांना तक्रारदार यांनी दाखल तारखेपासुन ते संपुर्ण रक्कम अदा होईपावेतो रक्कम रू. 1,97,400/- मात्र त्यावर 9 टक्के व्याजासह अदा करण्यात यावेत तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक, शारीरीक व आर्थीक त्रासापोटी रक्कम रू. 7,000/- मात्र व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रू. 3,000/- मात्र आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत करण्याबाबत आदेशीत केलेले आहे.