साहित्य समाज का आत्मा है – मा. श्री.निलय उपाध्याय
पाचोरा दि. 25 पाचोरा येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या IQAC व हिंदी विभागाच्यावतीने पुणे येथील प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि ‘देवो के देव महादेव’ या नावाजलेल्या हिंदी मालिकाचे लेखक मा. श्री. निलय उपाध्याय यांचे *’साहित्य और समाज’* या विषयावर दि. 16 फेब्रुवारी 2022, बुधवार रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्याना प्रसंगी त्यांनी साहित्य हा समाजाचा आरसा आहे. तेच समाजाचे प्रतिबिंब आणि आत्माही आहे. ते पुढे म्हणाले की, वेद-उपनिषदे, वाल्मिकी रामायण किंवा त्यानंतरचे महाभारत ते आजपर्यंतच्या साहित्यातून समाजाला वैचारिक दृष्टिकोन आणि मानवतेचा संदेश दिला गेला आहे. सत्य, अहिंसा, बंधुता, स्वातंत्र्य आणि समता ही तत्वे समाजामध्ये साहित्यानेच रुजवण्याचे कार्य केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मा. डॉ. बी. एन. पाटील होते. प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा हिंदी विभाग प्रमुख मा. प्रो. जे. व्ही. पाटील यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. वासुदेव वले, डॉ. निलेश जाधव, प्रो. डॉ. प्रशांत देशमुख, प्रा. गवारे, डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. एस. आर. ठाकरे, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. पी. एम. डोंगरे, प्रा. के. एस. इंगळे, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, प्रा. माणिक पाटील, प्रा. अतुल पाटील, डॉ. बालाजी पाटील, प्रा. अधिकराव पाटील, प्रा. नितीन पाटील, प्रा. गणेश देशमुख, प्रा. श्रीमती इंदिरा लोखंडे, प्रा. सुनील पाटील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. व्याख्यानाचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीमती क्रांती सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. स्वप्नील भोसले यांनी केले.