महाविकास आघाडी सरकारचे आभार : सचिन सोमवंशी
पाचोरा (प्रतिनिधी) – सकल मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध मागण्यांसाठी खा. छत्रपती संभाजी महाराज यांनी सूरु केलेल्या उपोषणाची गंभीर दखल घेत महाविकास आघाडी सरकारने राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या मागण्या मान्य करून ना. दिलीप वळसेपाटील, ना. एकनाथ शिंदे आदीं उपोषण स्थळी जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांना पत्र देवुन छत्रपती संभाजी महाराज यांचे उपोषण सोडले. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या भुमिकेचे मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक सचिन सोमवंशी यांनी आभार मानले असुन सदरच्या मागण्यांचा पाठपुरावा तात्काळ करण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे